किंग्स इलेव्हन पंजाबचा फिरकीपटू आणि विरेंद्र सेहवागचा भाचा मयांक डागरने यो-यो टेस्ट मध्ये सर्वाधिक 19.3 गुण मिळवत विराट कोहली आणि मनिष पांडेला मागे टाकले आहे.
2017 मध्ये विराट कोहलीने यो-यो टेस्टमध्ये 19 गुण मिळवले होते. तर मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडेने सर्वाधिक 19.2 गुण मिळवले होते.
https://www.instagram.com/p/BlNZAgGApCL/?hl=en&taken-by=mayank_dagar.fc
21 वर्षीय फिरकी गोलंदाज मयांक डागरला 2018 च्या आयपीएल लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या ताफ्यात सामिल केले होते.
मयांक डागर देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. त्याने हिमाचल प्रदेशकडून 11 प्रथम श्रेणी, 10 लिस्ट ए आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत.
गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात निवड होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यो-यो टेस्ट पास होणे गरजेचे आहे.
जून महिन्यात यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या संजू सॅमसन, अंबाती रायुडू आणि मोहम्मद शमी यांच्यासमोर युवा मयांक डागरने यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक 19.3 गुण मिळवत उत्तम उदाहरण उभे केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथ-वार्नर जोडीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा जोरदार धक्का
कारकिर्दीत पहिलाच चौकार मारणाऱ्या चहलने असे केले सेलिब्रेशन, अन्य खेळाडूंना हसू आवरेना