एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने पंचाकडून या सामन्यातील बॉल घेतल्याचा व्हीडीओ समोर आला होता.
धोनीच्या या कृतीने क्रिकेट विश्वात धोनीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीबाबतच्या चर्चेने जोर धरला होता.
मात्र भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, धोनीने तिसऱ्या सामन्यातील बॉल गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठी पंचाकडून घेतला होता. असा खुलासा केला आहे. त्याचबरोबर धोनीचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती शास्त्रींनी दिली.
गेल्या एक वर्षापासून एमएस धोनीच्या फलंदाजीतील कामगिरीत घसरण झाली आहे. तसेत नुकत्याच पार पडलेल्या इंग्लड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही धोनी निष्प्रभ ठरला होता.
या मालिकेतील लॉर्ड्स येथील दुसऱ्या सामन्यात धोनी ५९ चेंडूत ३७ धावांची संथ खेळी खेळला होत्या. त्यावेळी धोनीच्या या संथ खेळीची मैदानावरील प्रेक्षकांनी टिका करत खिल्ली उडवली होती.
त्यामुळे एमएस धोनीच्या पंचाकडून सामन्यानंतर बॉल घेण्याच्या कृतीमुळे धोनी एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेणार असा अंदाज क्रिकेट क्षेत्रातून व्यक्त केला जात होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-अॅडम गिलक्रिस्ट म्हणतो हा फिरकीपटू मला घाम फोडायचा