दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्स 2019 च्या आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे.
2018 ची आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर मे मध्ये डिव्हीलियर्सने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
त्यावेळी एबी डिव्हीलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दी बाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. एबी डिव्हीलियर्सने नुकतेच एका संकेतस्थाळाशी बोलताना तो 2019 च्या आयपीएलमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.
“मी आणखी काही वर्षे आयपीएल खेळत रहाणार आहे. तसेच टायटन्स संघासाठी खेळताना युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत रहाणार आहे.” आयपीएलच्या सहभागाविषयी बोलताना डिव्हीलियर्स असे म्हणाला.
तसेच बेंगलोर आणि भारताविषयी बोलताना एबी डिव्हीलियर्सने कृतज्ञता व्यक्त केली.
“बेंगलोर माझे दुसरे घर आहे. मी तीथे माझा शंभरावा कसोटी सामना खेळलो आहे. तसेच आरसीबी माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. भारतीयांनी मला त्यांच्यातील एक भाग म्हणुन सामावून घेतले आहे.” मिस्टर 360 ने बेंगलोर आणि भारताविषयी बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
असे आहे एबी डिव्हीलियर्सची आयपीएल कारकिर्द-
एबी डिव्हीलियर्सने आयपीएलमध्ये 141 सामन्यात 3,953 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 28 अर्धशतके आणि 3 शतके केली आहेत.
यामध्ये डिव्हीलियर्स 2008 ते 2011 दिल्ली डेअरडेव्हील्सकडून खेळला आहे. तर 2012 ते 2018 या मोसमात त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधीत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानची नवी इनिंग,बाॅलिवूडमध्ये करणार एॅंट्री?
हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?