भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
सुनिल गावसकरांनी त्यांच्या १६ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत जगातील भल्या भल्या गोलंदाजावर अधिराज्य गाजवले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करणारे सुनिल गावसकर जगातील पहिले फलंदाज होते. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम ३० शतके साजरे करणारे ते पहिले फलंदाज होते.
पुढे या मुंबईकर फंलंदाजाच्या पाऊलावर पाऊल टाकत दुसरा मुंबईकर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा २४ वर्ष साभाळली.
तसेच सचिनने गावस्करांचे कसोटीमधील सर्वाधिक धावांच्या विक्रम मोडत त्यांच्या कसोटीतील ३४ शतकांनाही मागे टाकले.
आज लिटिल मास्टर सुनिल गावस्करांना वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिनने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या होत्या.
“मी माझे प्रेरणास्थान असलेल्या सुनिल गावसकर सरांना १९८७मध्ये पहिल्यांदा भेटलो. १३ वर्षांचा असताना मला विश्वास बसत नव्हता की मी अशा व्यक्तीला भेटत आहे मला ज्याच्यासारखं व्हायचं आहे व क्रिकेट खेळायचं आहे. तो दिवस खास होता. सर तुम्हाला ७१व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पुढील वर्ष आनंदाचे जावो.” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला होता.
I got to meet my idol Gavaskar Sir for the first time in 1987.
As a 13 year old, I couldn’t believe my luck that I was meeting the person I looked up to & wanted to emulate. What a day that was.😍
Wishing you a very happy 71st birthday Sir. Have a healthy & safe year ahead. pic.twitter.com/u06c37ouDh
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2020
सचिन बरोबरच भारताच्या अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी सुनिल गावसकरांना ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरेलल्या विराटने क्षेत्ररक्षण करताना लुटली मैफील, पाहा भन्नाट व्हिडिओ
दुसऱ्या टी२० सामन्यात सामनावीर ठरलेल्या भुवीने दिलीये थेट कपिल देवला टक्कर! जाणून घ्या विक्रम
भारतीय संघातील जागा गमावलेला ‘हा’ यष्टीरक्षक आता मेंटॉर म्हणून सुरू करतोय नवी इनिंग