सोमवारी (16 जुलै) पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स स्पोर्ट्स क्लब बुलावायो येथे पार पडला.
या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने उत्साहाच्या भरात स्वत:ला जखमी करुन घेतले.
हसन अलीने सामन्याच्या 37 व्या षटकात पहिल्या चेंडूवर झिम्बाब्वेच्या रेयान मरेला बाद केले. त्यानंतर उत्साहाच्या भरात हसन अलीने जोरदार सेलिब्रेशन केले. मात्र हे करताना बेभान झालेल्या हसन अलीच्या मानेची शिर ताणली गेली. यावेळी हसन अली मोठी दुखापत होता होता थोडक्यात बचावला.
https://twitter.com/Iamrahul28/status/1018892961281708032
सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने हसन अलीला झालेली दुखापत किरकोळ असून तो मालिकेतील उर्वरित सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
या सामन्यात हसन अलीने 8.2 षटकात 32 धावा देत 3 बळी मिळवले.
झिम्बाब्वेने दिलेले 195 धावांचे आव्हान पाकिस्तानने 36 षटकात एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
यामध्ये सलामीवीर फकर जामनने नाबाद 117 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावनिक विराट कोहलीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार
-कुलदीप यादवला निष्प्रभ ठरवण्यासाठी आम्ही सज्ज- मार्क वुड