मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट आकादमीची’ बुधवारी (१८ जुलै) घोषणा केली.
या आकादमीत ९ ते १४ वर्ष वयोगटातील क्रिकेटपटूनां प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट आकादमीचे पहिले सराव शिबीर नार्थवुडच्या मर्चंट टेलर्स स्कूलमध्ये ६ ते ९ ऑगस्ट या दरम्यान पार पडणार आहे.
त्यानंतर या आकादमीचे सराव शिबीर मुंबई आणि लंडन येथे पार पडणार आहे.
A small step towards a big dream, “Tendulkar Middlesex Global Academy”, for all the young girls & boys to play & learn from top cricketing minds. Excited to be partnering with @Middlesex_CCC. @tendulkarmga
Full info: https://t.co/tQnDaEFPwz
Launch camp: https://t.co/WgEAEau63M pic.twitter.com/e6d5HA6G8N— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 18, 2018
इंग्लंड क्रिकेट संघाला मिडलसेक्स क्रिकेट क्लबने अॅंड्रू स्ट्रॉस, माइक गैटिंग, डेनिस कॉम्पटन, जॉन एमब्यूरे आणि माइक ब्रियर्ली यांच्यासारखे क्रिकेटपटू दिले आहेत.
स्वत: सचिन तेंडुलकर आणि एमसीसीच्या व्यावसायीक प्रशिक्षकांनी या आकादमी साठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे.
तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट आकादमी व्यतिरिक्त इतर गरजू क्रिकेटपटूंनी देखील या आकादमीत मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.
“मिडलसेक्स क्रिकेट क्लब सोबत मला काम करायला मिळणार आहे, त्यामुळे मी खुष आहे. या आकादमीतून चांगले क्रिकेटपटू निर्माण करणे आमचे ध्येय असेल. तसेच चांगल्या क्रिकेटपटू बरोबर या खेळाडूंमधून उत्कृष्ठ वैश्विक नागरिक घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.” या आकादमीची घोषणा करताना सचिन म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत यष्टीरक्षक धोनीने केले या फलंदाजाला अफलातून धावबाद
-केएल राहुलसाठी चाहते मैदानात, विराट कोहली आणि रवी शास्त्रींवर जोरदार टिका