टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (17 जुलै) इंग्लंड विरुद्धच्या लिड्स येथे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला.
या सामन्यानंतर एमएस धोनीने पंचाकडून सामन्याचा बॉल आपल्याकडे आठवण म्हणून ठेउन घेतला आहे. धोनीच्या या कृतीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
https://twitter.com/KSKishore537/status/1019298145447174146
यापूर्वी धोनीने 2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर अचानकपणे निवृत्ती जाहिर केली होती.
त्यावेळीही धोनीने यामालिकेतील तिसऱ्या सामन्यातील एक स्टम्प आपल्याकडे घेतला होता. ऐरवी सामना जिंकल्यानंतर स्टम्प काढून घेणाऱ्या धोनीने, अनिर्णीत राहीलेल्या सामन्यात स्टम्प काढून घेतल्याने अनेकांनी धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार असल्याचे भाकित केले होते. शेवटी अपेक्षेप्रमाणे धोनीने त्यावेळी निवृत्ती जाहिर केली होती.
इंग्लंडमध्ये 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून एम एस धोनी त्याच्या फलंदाजीच्या फॉर्मशी झगडत आहे.
तसेच नुकतेच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही धोनीची कामगिरी निराशाजनक झाली होती.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात धोनीने 59 चेंडूत 37 धावांची मंद खेळी केली होती. या खेळीमुळे मैदानावरील प्रक्षकांनी धोनीची खिल्ली उडवत टिका केली होती.
वयाच्या 37 व्या वर्षीही धोनीच्या यष्टीरक्षणातील चपळता कमी झाली नाही. तरी गेल्या एक वर्षांपासून फलंदाजीतील निराशजनक कामगिरीमुळे त्याच्या भारतीय संघातील समावेशावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने
-तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ