लिड्स | लिड्स येथे मंगळवारी (१७ जुलै) निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला ८ गडी राखून पराभूत केले.
इंग्लंडने भारता विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
या पराभवाबरोबरच कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या सलग ९ द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेच्या विजयी रथाला इंग्लंडने ब्रेक लावला.
यापूर्वी भारताने २००७ ते २००९ या काळात सलग सहा एकदिवसीय मालिकेत विजय मिळवले होते.
इंग्लड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकाही द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत पराभूत न होता सलग ९ एकदिवसीय मालिका जिंकला होता.
भारतीय संघ शेवटची एकदिवसीय मालिका एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २०१६ साली ऑस्ट्रेलियात पराभूत झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ४-१ ने मात दिली होती.
त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, इंग्लंड, आणि श्रीलंकेला भारतात पराभूत केले. तर श्रीलंका, वेस्ट इंडिज, झिंबाब्वे आणि दक्षिण अाफ्रिकेला त्यांच्या देशात एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता.
इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी आघाडी घेतली होती. मात्र इंग्लंडने उर्वरीत दोन्ही सामन्यात भारताला पराभूत करत एकदिवसीय मालिकेवर आपले नाव कोरले.
पहिल्या सामन्यान भारताने इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला ८६ धावांनी पराभूत करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर इंग्लंडने मंळवारी (१७ जुलै) भारताला आठ गडी राखून पराभूत करत एकदिवसीय मालिका जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या-
मायदेशात इंग्लंडने रचला इतिहास
जो रुटने केला पराक्रम, इंग्लंडकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज