डब्लिन | अलिकडील काळात वाढलेल्या बॉल टेंम्परींग प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने या घटनांना लगाम बसावा या दृष्टीने कडक शिक्षेची तरतूद केली आहे.
सोमवार, २ जुलैला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या बैठकीत याविषयीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
इथून पुढे कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बॉल टेंम्परींग प्रकरणात दोषी अाढळला तर तो लेव्हल तीनचा गुन्हा असेल. यापूर्वी बॉल टेंम्परींग लेव्हल दोनचा गुन्हा होता.
तसेच बॉल टेंम्परींग प्रकरणात दोषी अाढळलेल्या खेळाडूला इथून पुढे ६ कसोटी सामने किंवा १२ एकदिवसीय सामन्यांच्या बंदीची शिक्षा असेल. यासाठी यापूर्वी एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांच्या बंदीची शिक्षा होती.
तसेच खेळाडूंच्या मैदानावरील वर्तणूकीसंबंधी लेव्हल एकचे नवीन कलम आयसीसीने निर्माण केले आहे.
सोमवार, २ जुलैला डब्लिन येथे आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय
-आजपासून भारताच्या बहुचर्चित इंग्लंड दौऱ्याची सुरुवात