---Advertisement---

विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू आहे ‘भारताचा वनडे स्पेशालिस्ट’! वाचा दिग्गजाने कोणाचे घेतले नाव

On: शुक्रवार, जुलै 15, 2022 6:11 PM
Team India vs ENG
---Advertisement---

भारतीय संघामध्ये सध्या अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही युवा खेळाडूंनी पदार्पण करताच मैदाने गाजवत त्यांचे राष्ट्रीय संघातील स्थान पक्के केले आहेत. त्यातच स्फोटक फलंदाज शिखर धवन आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसत आहे. यापुढेही तो याच प्रकारच्या क्रिकेटमध्ये अधिक दिसण्याची शक्यता वर्तवली जात. याचे कारण म्हणजे तो सध्या झालेल्या कसोटी आणि टी२० मालिकांमध्ये संघात त्याला निवडले नाही. त्यातच त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठीही कर्णधार बनवण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या पुनरागमनाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी धवनचा बचाव केला आहे. सलामीवीर धवन अजूनही ५० षटकांच्या क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फलंदाज आहे, असे मत मांजरेकरांनी मांडले आहे.

धवन हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. मात्र, सध्या धवनकडे वनडे स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जात आहे. त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मांजरेकर यांनी निवडकर्त्यांचे कौतुक केले.

स्पोर्ट्स 18 वरील ‘स्पोर्ट्स ओव्हर द टॉप’ शोमध्ये मांजरेकर म्हणाले, “शिखर धवनकडे आता फक्त एकच फॉरमॅट आहे ज्यामध्ये तो खेळू शकतो, परंतु जर तुम्ही त्याच्या 50 षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी पाहिल्यास, ते नेहमीच सर्वोत्तम राहिले आहे.”

मांजरेकर पुढे म्हणाले, “धवनला सर्वात जास्त आवडते असे फॉरमॅट आहे आणि तो एक चांगला फलंदाज आहे आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला याचा मला खूप आनंद आहे.”

ओव्हल येथे भारताने इंग्लंडवर दहा विकेट्सने मिळवलेल्या विजयातमध्ये धवन आणि रोहित शर्मा यांनी नाबाद शतकी भागीदारी रचली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली होती. यामुळे ही जोडी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ५००० धावा पूर्ण करणारी चौथी जोडी ठरली.

आश्चर्य म्हणजे, धवनने त्याच्या कसोटी पदार्पणातच शतक झळकावले आहे. त्याने २०१३मध्ये मोहालीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८७ धावांची खेळी केली होती. तो सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता. त्याच्या या अविस्मरणीय खेळीमुळे तो सामनावीरही ठरला होता.

इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. या तिसऱ्या वनडे सामन्यात धवन आणि शर्मा ही जोडी आणखी एक संस्मरणीय भागीदारी करून मालिका जिंकेल, अशी आशा भारतीय संघाला असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

फक्त १७ वनडे सामन्यांचा अनुभव, तरीही इंग्लंडच्या पठ्ठ्याने भारताच्या ६ खेळाडूंना भरले ‘टोपली’त, वाचा सविस्तर

नाचा रे! लेकींसोबत पुन्हा थिरकला वॉर्नर, वरुण धवनच्या ‘नाच पंजाबन’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

फाॅर्मात नसलेल्या कोहलीसाठी इंग्लंडच्या कॅप्टनची फलंदाजी; म्हणाला, ‘तुम्ही असे कसे….’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---