---Advertisement---

भारतीय असल्याचा अभिमान! विराट, नीरज, सचिनसह भारतीय खेळाडूंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा खास ट्वीट

On: बुधवार, जानेवारी 26, 2022 5:41 PM
Sachin Tendulkar and Virat Kohli
---Advertisement---

देशभरात ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. हा दिवस भारतीयांच्या आयुष्यातील एक महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस असतो. त्यामुळे सर्व भारतीय एकमेकांना भेटून शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडसह क्रीडा विश्वातून देखील सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)  ट्वीट करत लिहिले की, ” सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.. ”

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ट्वीट करत लिहिले की, “प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.”

तसेच भारताला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra)  देखील ट्वीट करत सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने तिरंग्यासोबत आपला फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.”

माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) देखील ट्वीट करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विट करत लिहिले की, “आपल्या ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक भारतीयाला हार्दिक शुभेच्छा. आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे आणि मी सर्वांना शांती, चांगले आरोग्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देतो.”

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) ट्वीट करत लिहिले की, “आपल्या भारताहून अधिक मोकळ्या, अधिक आनंदी, अधिक सुंदर, अधिक समृद्ध अशा कोणत्याही भूमीला सूर्याने भेट देऊ नये”

तसेच सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील व्हिडिओ ट्वीट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले , “माझ्या सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..”

तसेच वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी ट्वीट करत लिहिले की, ” कोणतेही राष्ट्र परिपूर्ण नसते, ते परिपूर्ण बनले पाहिजे.  लाखो मैल अजून जायचे आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर

बिनबाद ७०९ धावा करणारे भारतीय क्रिकेटर, ज्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ

हे नक्की पाहा :

पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते । story of Cheteshwar Pujara

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---