मुंबई। मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणा-या एसएफए अजिंक्यपद स्पर्धेला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. ही शहरातील ही मोठी स्पर्धा ठरणार आहे. या हंगामात अॅथलीट्ससाठी 6 ते 18 वयोगट असणार आहे. या अजिंक्यपद स्पर्धेतील स्पर्धा युनिर्व्हसिटी क्रीडा संकुल, कलिना ( सांताक्रूझ), युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पव्हेलियन, मरीन लाईन (अॅथलेटिक्स), एमएसएलटीए कुपरेज (टेनिस), एमएचए चर्चगेट (हॉकी) येथे पार पडतील.
धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, आदित्य बिर्ला वर्ल्ड अकॅडमी, जमनाबाई नरसी, उत्पल संघवी ग्लोबल स्कूल, आर.एन.पोदार, रायन ग्रुप ऑफ स्कूल्स यांनी एसएफए अजिंक्यपद स्पर्धेसाठी नोंदणी केली. यासाठीची नोंदणी सुरु आहे. आयोजकांना चॅम्पियनशिपमध्ये 20 हजार अॅथलीटच्या सहभागाची अपेक्षा आहे.
एसएफएने स्थानिक पातळीवर शाळेसोबत मुलांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. प्रत्येक मुलाने खेळण्यासाठी यावे हे आमचे लक्ष्य आहे. आम्ही ऑलिम्पिक शैलीत एसएफए चॅम्पियनशिप आयोजित करण्यासोबतच प्रत्येक स्पर्धकाला चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. 2015 पासून एसएफएने सर्व डाटा गोळा करत आहोत. यावरुनच शहरातील या स्पर्धेबाबत आपल्याला कल्पना येईल, असे स्पोर्ट्स फॉर ऑलचे संस्थापक ऋषिकेश जोशी यांनी सांगितले.
गेल्या चार वर्षात सात एसएफए चॅम्पियनशिपचे (4 मुंबईत व 3 हैदराबाद) यशस्वी आयोजन करण्यात आले व त्यामध्ये 1700 हून अधिक शाळा आणि 1,14,000 अॅथलीट्स सहभागी झाले. सध्या दोन शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन होत आहे. एसएफएचा प्रयत्न ही संख्या 20 वर नेण्याचा पुढील तीन वर्षात प्रयत्न आहे. एसएफएच्या माध्यमातून शालेय क्रीडा प्रणालीत बदल पहायला मिळत आहे. त्यामध्ये अनेक चांगले खेळाडू पुढे येऊन ते भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना पहायला मिळतील.
एसएफएचे ऑनलाईन पोर्टल हे टॅलेंटच्या माहितीसठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे. या माध्यमातून शाळा व खेळाडूंच्या प्रवासाबाबत माहिती मिळण्यास मदत होते. पदकासोबत, क्रीडा प्रकारातील चषके, सर्वोत्तम खेळाडू व सर्वोत्तम शाळा यांची माहिती देखील देण्यात आली आहे. गेल्या वर्षाची चॅम्पियन शाळा असलेली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाच्या (बोरीवली) प्राचार्य मनिषा आरोंडेकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय चांगला अनुभव आहे. स्पर्धांचे आयोजन अतिशय व्यावसायिक पद्धतीने करत आहे. ऑनलाईन रेकॉर्ड प्रणाली देखील पारदर्शक आहे.
एसएफए मुंबईमध्ये 500 हून अधिक शाळा व 17 हजारहून अधिक अॅथलीट्सने आपला सहभाग नोंदवला होता. चॅम्पियनशिपमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, क्रिकेट स्टार हरभजन सिंग, टेनिस स्टार सोमदेव देवबर्मन आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक रॉनल्ड सिम्स ज्यु.याचा सहभाग असेल. ते अनेक कार्यशाळा, क्लिनिक्स, प्रदर्शनीय सामने, हायड्रेशन व न्युट्रिशन सत्रात मार्गदर्शन करतील. एसएफए चॅम्पियनपसाठी मुंबईतील खेळाडू सज्ज असून स्पर्धेची नोंदणी www.sfanow.in या संकेतस्थळावर सुरु असून 20 नोव्हेंबरला संपेल.