लंडन | गुरुवारी (२६ जुलै) महिला हॉकी विश्वचषकाच्या गट फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अायर्लंडकडून १-० ने पराभव स्विकारावा लागला.
या सामन्यात जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या भारतीय संघाला चौथ्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला मात्र अायर्लंडच्या बचावफळीला भेदण्यात भारताला अपयश आले.
त्यानंतर भारतीय खेळाडूंच्या चुकीमुळे १२ मिनिटाला अायर्लंडला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर ओना फ्लेनगनने गोल करत आघाडी मिळवून दिली.
या सामन्यात भारतीय संघाला सहा वेळा पेनाल्टी कॉर्नर मिळाला मात्र यामध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही.
पूर्णपणे एकतर्फी झालेल्या या सामन्यावर अायर्लंडने एकहाती वर्चस्व गाजवले.
या पराभवामुळे भारताचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. जर भारताला विश्वचषकातील पुढील फेरी गाठायची असेल तर अमेरिके विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजयाबरोबर, इंग्लंड वि. आयर्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-तो एक स्वार्थी, गर्विष्ठ आणि हुकूमशहा आहे, आम्हाला तो कर्णधार म्हणुन नकोच
-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!