कोलंबो । श्रीलंकन क्रिकेटपटू भारताविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी रवाना होण्यासाठी जेव्हा विमानतळावर आले तेव्हा त्यांना देश सोडण्यापासून श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी रोखले आहे.
या दौऱ्यासाठी संघात संघात ज्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे त्यांच्या निवडीवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा खुश नाही. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
“सोमवारी रात्री भारताकडे मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होणाऱ्या संघातील ९ खेळाडूंना देश सोडण्यापासून रोखण्यात आले आहे. ” असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने एका खेळाडूच्या हवाल्याने दिले आहे.
वनडे आणि टी२० मालिकेसाठी ज्या खेळाडूंची निवड झाली आहे त्यातील निरोशन डिकवेलला, सदिरा समरवीरा, लाहिरी थिरिमने आणि अँजेलो मॅथ्यूजने हे कसोटी मालिकेत सध्या खेळत आहेत तर अन्य खेळाडूंमध्ये कर्णधार थिसारा परेरा, उपुल थरांगा, दनुष्का गुनाथिलाका, असेला गुणरत्ने, चथुरंगा डी सिल्वा, सचिथा पाठीराना, दुशमंथा चामीरा आणि नुवान प्रदीपा या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू काल भारताकडे रवाना होण्यासाठी कोलंबो येथे जमले होते.
क्रीडा मंत्र्यांना आहे का अधिकार?
१९७३ मधील घटना दुरुस्तीनुसार श्रीलंकन क्रीडा मंत्री स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय संघात बदल करू शकतात. श्रीलंकेतील सूत्रांप्रमाणे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा यांना या संघात दोन बदल हवे आहेत. त्यामुळे ते तशी सूचना लंकेच्या क्रिकेट बोर्डाला करू शकतात.
भारतीय दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ: थिसारा परेरा(कर्णधार), निरोशन डिकवेलला, सदिरा समरवीरा, लाहिरी थिरिमने,अँजेलो मॅथ्यूजउपुल थरांगा, दनुष्का गुनाथिलाका, असेला गुणरत्ने, चथुरंगा डी सिल्वा, सचिथा पाठीराना, दुशमंथा चामीरा आणि नुवान प्रदीपा