मंगळवार, ३ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात स्वीडनने स्वित्झर्लंडला १-० अशा गोलफरकाने पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली.
जागतिक फिफा क्रमवारीत ६ व्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंड आणि १२ व्या स्थानी असलेल्या स्वीडन यांच्यात बाद फेरीचा हा सामना अंत्यंत चुरशीचा झाला.
या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघानी तोडीचा खेळ करत एकमेकांसमोर आव्हान उभे केले मात्र यामध्ये दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले.
स्वीडनच्या एमिल फॉर्सबर्गने या सामन्यात ६६ व्या मिनिटाला गोल करत स्वीडनला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये ही आघाडी कायम राखत स्वीडनने स्वित्झर्लंडचा १-० असा पराभव केला.
या फिफा विश्वचकाच्या उपांत्य पूर्व फेरीत आपले स्थान पक्के करत स्वीडनने उपांत्य फेरी गाठण्याचा २४ वर्षाचा दुष्काळ संपुष्टात आणला.
यापूर्वी अमेरिकेत झालेल्या १९९४ च्या फिफा विश्वचषकात स्वीडनने तीसरे स्थान मिळवले होते.
या विजयाबरोबर उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवलेल्या स्वीडनचा पुढच्या फेरीतील सामना ७ जुलैला इंग्लडशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: फिफा विश्वचषकात अनेक खेळाडूंची ठरणार पहिलीच…
-फिफा विश्वचषक: ५० वर्षात कधीही विश्वचषक न जिंकलेले संघ…