मुंबई | भारताच्या दौऱ्यावर आलेले जपानचे कॉन्सल जनरल रोयोजी नोडा यांनी भारताकडे २०३२ ची ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत करण्याची क्षमता असल्याचे वक्तव्य केले आहे.
२०२० ची ऑलिंपिक स्पर्धा जपान मधील टोकियो शहरात होणार आहे. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धा आणि भारत याविषयी जपानचे कॉन्सल जनरल रोयोजी नोडा यांनी भाष्य केले.
” येत्या काळात २०२० टोकियो, २०२४ पॅरिस आणि २०२८ लॉस एंजेल्स येथे ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर २०३२ साली होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळवण्यासाठी भारत प्रमुख दावेदार आहे. २१ व्या शतकात विविध क्षेत्रात यशाची शिखरे गाठणाऱ्या भारतासाठी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करने काही अवघड नाही.” असे जपानचे कॉन्सल जनरल रोयोजी नोडा म्हाणाले.
“भारत-जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध गेल्या कित्येक वर्षांपासून चांगलेच नव्हे तर घट्ट आहेत.” जपानचे कॉन्सल जनरल मुंबई येथील एका कार्यक्रमात म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषकातील अचूक निकाल सांगणाऱ्या ऑक्टोपसचे केले तुकडे
-मेस्सीच्या अर्जेंटीनाचा हेडमास्तर होण्याची कोणतीही फी घेणार…