कोची । भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एमएस धोनी आणि राहुल द्रविडवर टीका केली आहे. श्रीसंतच म्हणणं आहे की दोघांनीही वाईट काळात त्याची साथ दिली नाही.
एका इंग्रजी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो पुढे असाही म्हणाला आहे की
श्रीसंत द्राविडबद्दल बोलताना म्हणाला, ” जेव्हा मला गरज होती तेव्हा द्रविडने संघासोबत राहणे पसंत केले. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. द्रविड मला चांगले ओळखत असतानाही त्यांनी असे केले. “
एमएस धोनीबद्दल बोलताना श्रीसंत म्हणाला, ” मी अतिशय भावनिक होऊन धोनीला संदेश पाठवला. परंतु त्याने कोणताही रिप्लाय केला नाही. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होत.
“स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अजूनही १० खेळाडूंची नावे होती. त्यांनाही दिल्ली पोलिसांनी आरोपी बनवलं होत. परंतु सगळी नावे बाहेर आली तर त्याचा मोठा खेळावर परिणाम झाला असता. हा काही राष्ट्रीय संघ नाही. बीसीसीआय एक खाजगी संस्था आहे. त्यामुळे मला सामंती मिळाली तर मी दुसऱ्या देशाकडून खेळेल. “