मुंबई । आयपीएल सुरू होऊन जेमतेम एक आठवडा झाला आहे. या पहिल्या आठवड्यात आयपीएलमधील सर्व संघ प्रत्येकी ३ सामने खेळले आहेत.
हा संपुर्ण आठवडा हा क्रीडा चाहत्यांसाठी अनेक अर्थांनी खास राहिला. अनेक खेळांच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांचं या काळात आयोजन करण्यात आले होते.
अशा या खास आठवड्यात आयपीएलमध्ये अनेक गमतीशीर विक्रम झाले. त्यातील काही निवडक-
-या आठवड्यात ३ पैकी ३ सामने जिंकणारा हैद्राबाद हा एकमेव संघ
-या आठवड्यात ३ पैकी ३ सामने पराभूत होणारा मुंबई हा एकमेव संघ
-३ पैकी ३ सामन्यात एकही खेळाडू न बदलणारा राजस्थान हा एकमेक संघ
-पहिल्या १२ सामन्यात एकही खेळाडूने शतक करता आले नाही
-एकाही खेळाडूला एकपेक्षा जास्त अर्धशतक करता आले नाही.
-एकाही गोलंदाजाने सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या नाहीत
-१६२व्या सामन्यात धोनीने त्याचा आयपीएलमधील सर्वोच्च स्कोर केला
-धोनी नाबाद असताना संघ पराभूत होण्याची ही केवळ तिसरी वेळ