---Advertisement---

पॅट कमिन्सला वाटते ‘या’ भारतीय फलंदाजाची भीती; म्हणाला, “त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणं खूपच भीतीदायक”

On: सोमवार, मे 20, 2024 5:56 PM
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं आयपीएलच्या या हंगामात 209.41 च्या स्ट्राईक रेटनं 467 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्यानं 35 चौकार आणि तब्बल 41 षटकार लगावले. या हंगामात त्याच्या नावे 3 अर्धशतकी खेळीही आहेत. अभिषेकच्या या कामगिरीवर संघाचा कर्णधार पॅट कमिन्स फार खूश आहे. त्यानं पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना अभिषेक शर्माचं खूप कौतुक केलं.

पॅट कमिन्स म्हणाला की, तो (अभिषेक) अद्भूत आहे. मला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करायला आवडणार नाही. हे धडकी भरवणारं आहे, कारण तो वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंविरुद्ध न घाबरता खेळतो”. यावेळी पॅट कमिन्सनं संघाचा युवा फलंदाज नितीश रेड्डीची देखील प्रशंसा केली.

कमिन्स म्हणाला, “नितीश खूप चांगला खेळाडू आहे. तो त्याच्या वयापेक्षा जास्त अनुभवी वाटतो. असं वाटतं की तो खेळाला खूप चांगल्या प्रकारे समजतो. तो आमच्या वरच्या फळीत एकदम उपयुक्त फलंदाज आहे.”

रविवारी (19 मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 66 धावा केल्या आपल्या या खेळीत त्यानं 5 चोकार आणि 6 षटकार लगावले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 235.71 एवढा राहिला. या सामन्यात हैदराबादनं पंजाबनं दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 5 चेंडू राखून पूर्ण केला.

अभिषेक शर्मानं पंजाब किंग्जविरुद्ध अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे, हे त्याच्या हंगामातील सर्वात स्लो अर्धशतक होतं. त्यानं या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध 16 चेंडूत, तर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. अभिषेकची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 75 आहे, जी त्यानं लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रचली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्वालिफायर सामन्यापूर्वी केकेआरचे खेळाडू भगवंताच्या चरणी, गुवाहाटीतील ‘कामाख्या देवी’चा घेतला आशीर्वाद

आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळवून देणाऱ्या यश दयालच्या आईची प्रतिक्रिया, रिंकूच्या 5 षटकारानंतर पडली होती आजारी!

आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामीवर झाला रेकॉर्डब्रेक आवाज, धोनीची एंट्रीही ठरली फिकी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---