इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पहिला टप्पा आता संपत आला असून लवकरच दुसरा टप्पा सुरु होत आहे. तत्पुर्वी गुणतालिकेत तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी उर्वरित हंगामासाठी डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन दूर करुन केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा सोपवली आहे. त्यामुळे आज (०२ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या हंगामातील २८ व्या सामन्यात विलियम्सन हैदराबाद संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.
अशात विलियम्सन संघाला आपला पहिलाच सामना जिंकवून देण्याच्या उद्देश्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करु शकतो. असे म्हटले जात आहे की, हैदराबादकडून सलामीवीराची भूमिका निभावणाऱ्या वॉर्नरला बाकावर बसवले जाऊ शकते. याबद्दल संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मूडी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली होती की, संघाच्या परदेशी कॉम्बिनेशनमध्ये बदल केले जाऊ शकतात. हे पाहता, इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टोसोबत त्याचा संघ सहकारी अर्थात इंग्लंडचा ३० वर्षीय फलंदाज जेसन रॉयला सलामीला पाठवले जाऊ शकते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादकडून डावाची सुरुवात करणाऱ्या वॉर्नरला अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले जाण्याची दाट शक्यता होती.
आता टॉम मूडी या चर्चेंवर मोहर लावली आहे. त्यांनी सामन्यापुर्वी माहिती दिली आहे की, वॉर्नरला राजस्थानविरुद्ध अंतिम ११ जणांच्या पथकात संधी दिली जाणार नाही. “आम्हाला सामने जिंकत हंगामात पुनरागमन करण्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. म्हणून कोणाला तरी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करावे लागणार आहे. दुर्दैवाने ती व्यक्ती वॉर्नरच आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
'We had to make the hard call – somebody has to miss out and unfortunately it's him'#SRH director of cricket Tom Moody confirms that David Warner won't be playing today
https://t.co/HE7EMiMqdi | #IPL2021 | #RRvSRH pic.twitter.com/a5O7GjT5t9
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 2, 2021
वॉर्नरला टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये गणले जाते. आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून त्याने ६ सामन्यात २ अर्धशतकांसह त्याने १९३ धावा केल्या आहेत. परंतु जेसनचीही टी२० स्वरुपातील आकडेवारी प्रशंसनीय राहिली आहे. त्याने इंग्लंडमधील सर्रे संघाकडून ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट खेळताना ५७ चेंडूत शतक झळकावले होते. याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४३ सामन्यात १०३४ धावाही केल्या आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन वॉर्नरच्या जागी जेसनची निवड करु शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या कर्णधारासह हैदराबादचा होणार ‘सनराईज’, पाहा विलियम्सन आणि सॅमसनचे संघ?
मुंबई-चेन्नई सामन्यात कायरन पोलार्ड आणि सॅम करनमध्ये चकमक, डोळे वटारत काढली खुन्नस
कृणालच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमापार, मग काय गोलंदाज बोल्टचा चढला पारा; बघा व्हिडिओ