आयपीएल 2021 ही स्पर्धा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी फारच निराशाजनक ठरली आहे. संघाला सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागत असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेत डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन पायउतार केले. वॉर्नरच्या जागी संघाचे नेतृत्व केन विलियम्सन करणार आहे. हा मोठा निर्णय माध्यमांमध्ये येण्यापूर्वी वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक जुना व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्रिकेट स्टेडियम ‘वॉर्नर…वॉर्नर’ हा नारा देत होते.
वॉर्नरने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला व्हिडिओ 2019 आयपीएल हंगामातील आहे. त्यावेळी वॉर्नरने चेंडू छेडछाड प्रकरणातील बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते. या सामन्यात वॉर्नरने रॉयल चॅलेंजेस बेंगलोर संघाविरुद्ध शानदार शतकीय खेळी केल्यानंतर हैदराबादमधील संपूर्ण स्टेडियम त्याचा नावाचा जयजयकार करत होते. वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करत आपण आपल्या चाहत्यांना फार मिस करत असल्याचे म्हटले होते.
https://twitter.com/Over_the_covers/status/1388448724163063811
विशेष म्हणजे वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याचे कर्णधारपद काढून घेणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे अनेक जण अंदाज बांधत आहेत की वॉर्नरने भावनिक होवून हा व्हिडिओ शेअर केला होता.
वॉर्नरच्या कामगिरीचा विचार केला असता, तो खऱ्या अर्थाने हैदराबाद संघाचा एक आधारस्तंभ म्हणून गणला जातो. 2014 पासून हैदराबादच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या वॉर्नरने आपल्या नेतृत्वात 2016 साली हैदराबाद संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
वॉर्नर हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक सातत्य राखणाऱ्या खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने 2015, 2017 व 2019 या तीन वर्षात आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा) पुरस्कार जिंकलेला आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की आयपीएल 2022 च्या मोठ्या लिलावापूर्वी हैदराबाद त्याला आपल्या संघात ठेवतो अथवा तो लिलाव प्रक्रियेत सहभागी होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार
राजस्थान रॉयल्स संघात लिविंगस्टोनच्या जागी ‘या’ तरुण शिलेदाराची निवड, पाहा कशी राहिली आहे कारकिर्द
एमएस धोनीशी तुलना केली जाणाऱ्या ‘या’ पठ्ठ्याचे झाले आयपीएल पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल