सनराइजर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये त्याचं घरेलू मैदान बदलण्याची धमकी दिली आहे. तिकिटांच्या विक्री संबंधित हैदराबाद फ्रेंचाइजी आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन आमने सामने आहेत. सनराइजर्स हैदराबाद संघाचे मॅनेजर यांनी असोसिएशनच्या कोषाध्यक्ष, सीजे श्रीनिवास यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, हैदराबाद संघ कोणत्याही परिस्थितीत असोसिएशनची लुडबुड खपवून घेणार नाही. या पत्रात विशेष स्वरूपात असोसिएशनचे प्रेसिडेंट जगन मोहन राव यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
टाइम्स ऑफ इंडिया नुसार सनराइजर्स हैदराबाद कडून दावा केला जात आहे की, असोसिएशन अधिकाऱ्यांकडून 2024 पासून चुकीचं वर्तन केले जात आहे. तसेच गुरुवार 27 मार्च रोजी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये SRH vs LSG हा सामना खेळला गेला होता. ज्या सामन्यात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी VIP बॉक्स बुक केलं होतं.
सनराइजर्स हैदराबादने काही हिस्सेदारांसोबत करार केला आहे. ज्या अंतर्गत संघ लाभकारांना 3,900 तिकिटे उपलब्ध करायची असतात, यामधील VIP बॉक्स ची 50 तिकीटे एचसीएसाठी निश्चित केलेली असतात. पण हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने दुसऱ्या VIP बॉक्ससाठी सुद्धा 20 तिकिटांची मागणी केली होती. जेव्हा ही मागणी फेटाळण्यात आली तेव्हा, लखनऊ सामन्यादरम्यान म्हटले गेले की VIP बॉक्सला ताब्यात घेण्यात आले आहे.
सनराइजर्स हैदराबाद संघाच्या मॅनेजरने म्हटले की, एचसीएच्या प्रेसिडेंटने संघाच्या स्टाफला काहीवेळा धमकी दिली आहे. मॅनेजरने सांगितले की, हे पहिल्यांदा घडलं नाही की जेव्हा फ्री तिकिटांबाबत ब्लॅकमेल केलं जातं आहे. कोषाध्यक्ष यांना लिहिलेल्या पत्रात साफ लिहिल आहे, हैदराबाद संघ त्याचं घरेलु मैदान बदलू शकते. जर असोसिएशनची वागणूक बदलली नाही तर या संबंधित बीसीसीआयकडे तक्रार केली जाईल.