इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ४० वा सामना सोमवार रोजी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स यांच्यात दुबई येथे होतो आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने १८.३ षटकातच राजस्थानचे आव्हान पूर्ण करत ७ विकेट्सने सामना जिंकला आहे.
हैदराबादकडून पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या जेसन रॉयने सलामीला फलंदाजीला येत अर्धशतक झळकावले आहे. अर्धशतक केल्यानंतर राजस्थानच्या चेतन सकारियाने ११.६ षटकात संजू सॅमसनच्या हातून त्याला झेलबाद केले आहे. त्यामुळे ४२ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६० धावांवर त्यांच्या खेळीचा शेवट झाला. तत्पूर्वी वृद्धिमान साहाच्या (१८ धावा) रुपात संघाला पहिला धक्का बसला होता.
जेसन बाद झाल्यानंतर नुकताच फलंदाजीला आलेला प्रयम गर्गही शून्य धावेवर मुस्तफिजुर रेहमानचा बळी ठरला. मात्र पुढे कर्णधार केन विलियम्सनने संघाचा डाव सावरला. त्याने डावाखेर नाबाद राहून चौफेर फटकेबाजी केली आणि खणखणीत षटकार ठोकत १९व्या षटकातच सामना जिंकून दिला. ४१ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ५ चौकार मारत तो ५१ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या जोडीला युवा अभिषेक शर्मानेही नाबाद २१ धावांचे योगदान दिले.
राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान, महिपाल लोमरोर आणि चेतन सकारिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
That's that from Match 40.#SRH win by 7 wickets.
FIFTY for the Skipper and their second win in #VIVOIPL 2021.
Scorecard – https://t.co/3wrjO70JvR #SRHvRR #VIVOIPL pic.twitter.com/P5GCVzGKe6
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2021
संजू सॅमसनची कर्णधार खेळी
तत्पूर्वी या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांची दाणादण उडवली. संघनायक संजू सॅमसनच्या कर्णधार खेळीमुळे राजस्थानने निर्धारित २० षटकअखेर ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान मिळाले आहे.
पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. १.१ षटकातच त्यांनी ११ धावांवर एविन लुईसच्या रुपात पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि संजूने मिळून अर्धशतकी भागिदारी केली. परंतु संदीप शर्माने यशस्वीला ३६ धावांवर त्रिफळाचीत करत त्यांची भागिदारी मोडली. मात्र पुढे संजूने मोर्चा सांभाळला. त्याने अंतिम षटकापर्यंत धुव्वादार फटकेबाजी करत ८२ धावांची अप्रतिम खेळी केली.
अंतिम षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिद्धार्थ कौलने त्याला अब्दुल समदच्या हातूने झेलबाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. संजू ५७ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ८२ धावा करत झेलबाद झाल्या. अखेर महिपाल लोमरोरने नाबाद २९ धावा फटकावत संघाची धावसंख्या १६४ पर्यंत पोहोचवली.
हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्मा, राशिद खान आणि भुवनेश्वर कुमार यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break!
A superb knock of 82 from the #RR Captain propels them to a total of 164/5 on the board.#SRH chase coming up shortly.
Scorecard – https://t.co/3wrjO6J87h #SRHvRR #VIVOIPL pic.twitter.com/ajSu25YkEq
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2021
उभयंतांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वपूर्ण बदल
हैदराबाद संघ आतापर्यंत ८ सामने गमावत प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र पराभवासह हंगामाचा शेवट न करता आपली लाज वाचवण्यासाठी हा संघ सामने जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर राजस्थान संघही त्यांचे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल.
या उभय संघातील सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक झाली आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागी दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. ख्रिस मॉरिस आणि एविन लुईस यांचे पुनरागमन झाले आहे.
तर हैदराबाद संघानेही डेविड वॉर्नरच्या जागी जेसन रॉयला संधी दिली आहे. तसेच मनिष पांडे आणि केदार जाधव यांच्याजागी प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवकांचे पुनरागमन झाले आहे. याखेरीज दुखापतग्रस्त खलिल अहमदही बाकावर असून सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.
.@rajasthanroyals have won the toss and they will bat first against #SRH.
Live – https://t.co/hhKTGSojjm #SRHvRR #VIVOIPL pic.twitter.com/P9INTsd6RB
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2021
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमर, रियान पराग, राहुल तेवाटिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, जयदेव उनाडकट, मुस्तफिजूर रहमान