भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी आशिया चषक 2023 सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. श्रीलंका संघाने या सामन्या नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. 50 षटकांच्या सामन्यात श्रीलंका संघ यावेळी 20 षटकेही खेळू शकला नाही. हे तर सोडाच, त्यांचा आख्खा डाव अवघ्या 50 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. श्रीलंकेला एवढ्या कमी धावसंख्येवर सर्वबाद करत भारताने 24 वर्षांनंतर बदला घेतला.
संघाचे 5 फलंदाज शून्यावर बाद
श्रीलंका संघाचा कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय संघाच्या अंगलट आला. यावेळी श्रीलंका संघ अवघ्या 15.2 षटकात फक्त 50 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून फक्त कुसल मेंडिस याने सर्वाधिक 17 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त दुशान हेमंथा याने नाबाद 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने दोन आकडी धावसंख्या केली नाही. संघाचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, दसून शनाका आणि मथीशा पथिराना यांचा समावेश होता.
Innings Break!
Sensational bowling display from #TeamIndia! ⚡️ ⚡️
6⃣ wickets for Mohd. Siraj
3⃣ wickets for vice-captain Hardik Pandya
1⃣ wicket for Jasprit BumrahTarget 🎯 for India – 51#AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/kTPbUb5An8
— BCCI (@BCCI) September 17, 2023
भारताने घेतला 24 वर्षांनंतर बदला
विशेष म्हणजे, 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999मध्ये कोको-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाला 54 धावांवर सर्वबाद केले होते. मात्र, आता 24 वर्षांनंतर आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुवर्णसंधी साधत श्रीलंकेला 50 धावांवर सर्वबाद करत बदला घेतला.
India 54 all-out in the Coco-Colo Champions Trophy final in 1999 vs SL.
Sri Lanka 50 all-out in the Asia Cup final in 2023 vs IND.
Revenge has taken after 24 years. pic.twitter.com/0fAYzmDPkm
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
सिराज चमकला
श्रीलंकेच्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चमकला. सिराजने यावेळी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. सिराजने डावातील चौथ्या षटकातच चार विकेट्स नावावर केल्या होत्या. त्याने या सामन्यात 7 षटके गोलंदाजी करताना 1 निर्धाव षटकासह 21 धावा खर्चून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त उपकर्णधार हार्दिक पंड्या यानेही 3 विकेट्स आणि जसप्रीत बुमराह याने 1 विकेट नावावर केली.
आता भारतापुढे आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 1च्या रनरेटने फक्त 51 धावांचे आव्हान आहे. (Sri Lanka 50 all out in the Asia Cup final in 2023 INDvsSL)
हेही वाचा-
सिराजसमोर श्रीलंकेचे लोटांगण! आशिया कप विजयासाठी टीम इंडियाला 51 धावांचे आव्हान
सिराजकडे पाहून खदाखदा हसले विराट आणि गिल, कारण जाणून तुम्हीही व्हाल लोटपोट