शनिवारपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक २०२२ ची (Asia Cup 2022) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व आशियाई संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. जेणेकरून त्यांना विरोधी संघांना काट्याची टक्कर देता येईल. या स्पर्धेची सुरुवात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (Sri Lanka vs Afghanistan) संघातील सामन्याने होईल. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
तत्पूर्वी आशिया चषकातील उद्घाटनाचा सामना भारतात कुठे लाईव्ह (Live Streaming) पाहता येईल?, त्यांची प्लेइंग इलेव्हन (Playing Xi) कशी असेल?, याबद्दल जाणून घेऊ…
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
तारीख आणि वेळ: शनिवार २७ ऑगस्ट, ७.३० वाजता
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल
श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संपूर्ण संघ-
श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुणतिलका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ असलांका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजय डिसिल्वा, वानिंदु हसरंगा, महीष तीक्षणा, जैफ्री वांडेरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, मतीशा पथिराना, नुवानिदु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल
अफगानिस्तान टीम: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह ज़दरान, अफसर ज़ज़ई, अज़मतुल्लाह ओमरज़ई, फरीद अहमद मलिक, फजलहक फारूकी, हशमतुल्ला शाहिदी, हज़रतुल्लाह जजई, इब्राहिम ज़दरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नजीबुल्लाह ज़दरान, नूर उल अहमद, रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, समीउल्लाह शिनवारी
स्टँडबाय: निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अशरफ
श्रीलंका आणि अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
श्रीलंकेचा संघ: पाथुम निसांका, धनुष्का गुनाथिलाका, भानुका राजपक्षे, चरिथ असलांका, धनंजया डी सिल्वा, दसून शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, माहिश थिक्षना, चमिका करुणारत्ने, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.
अफगाणिस्तान संघ : नजीबुल्ला झदरन, हजरतुल्ला झाझाई, इब्राहिम झदरन, उस्मान घनी, रहमानउल्ला गुरबाज, मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद, करीम जनात.
भारत-पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी हाँगकाँगचे जोरदार सेलिब्रेशन, क्वालिफाय झाल्याचा आनंद अनावर
जगातील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ क्रिकेटरबद्दल १० माहित नसलेल्या गोष्टी
भारताची प्लेइंग इलेव्हन ‘फुटली’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय संघ?