गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या आशिया चषकाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात खेळला गेला. यावेळी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पहिल्या ओव्हरपासून श्रीलंकन फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला आणि पहिल्या डावाअखेर श्रीलंकेला केवळ 105 धावांवर गुंडाळले.
अफगाणिस्तान संघाने प्रथम गोलंदाजी करत श्रीलंकन फलंदाजांवर दबाव निर्माण केला. पहिल्याच षटकात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजल फारुकी याने श्रीलंकेचे दोन गडी बाद केले. त्यानंतर कालांतराने श्रीलंकेने आपल्या विकेट्स गमावल्या. यावेळी श्रीलंकेसाठी भानुका राजपक्षे याने सर्वाधिक 38 धावा तर चामिका करुनारत्ने याने 31 धावा केल्या. तर दुसरीकडे अफगाणिस्तानसाठी फजल फारुकी याने सर्वाधिक 3, तर कर्णधार मोहम्मद नबी आणि मुजीब अल रेहमान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आता अफगाणिस्तान संघाला हा सामना जिंकत क्वालिफायरच्या तिकीटावर हक्क सांगायचा असेल. तर त्यांना या सामन्यात विजय मिलवण्यासाठी 20 षटकांत 106 धावा कराव्या लागतील. शिवाय श्रीलंकेचे गोलंदाज देखील या सामन्यात आपल्या युवा गोलंदाजांच्या जोरावर अफगाणिस्तानला टक्कर देण्याचा प्रयत्न करतील.
दरम्यान, आशिया चषकातील बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामना आता नजीक आला आहे. रविवार 28 ऑगस्ट रोजी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळले आता या सामन्याची आतुरता संपत आली असून ही रोमहर्षक लढत पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेटचाहता देखील सज्ज झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा स्टार अष्टपैलू आता सिनेसृष्टीत करतोय पदार्पण! चित्रपटाचा ट्रेलर पाहून सुरेश रैना झाला फॅन
अल्टीमेट खो खो लीगमधील अनुभव युवा खेळाडूंना देणार-दुर्वेश साळुंखे
नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, लौसान डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा ठरला पहिलाच इंडियन