---Advertisement---

मोठी बातमी ! श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून टी20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाकडे संघाचे नेतृत्व

Sri Lanka t20 team
---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि यु.एस.ए. मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आतापर्यंत भारत, इंग्ल्डंड, न्यूझीलंड सह अनेक देशांनी आपाल्या संघांची घोषणा यापूर्वीच केली आहे. आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही गुरुवारी, 9 मे ICC T20 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 साठी संघाची घोषणा केली. माजी विश्वचषक संघातील विजेता खेळाडू अँजेलो मॅथ्यूज हाही श्रीलंकेच्या 15 सदस्यीय संघाचा भाग असणार आहे.

अँजेलो (36) ICC T20 विश्वचषक 2014 जिंकलेल्या संघाचा भाग होता आणि यंदाच्या वर्ल्डकपमध्येही त्याचा सहभाग असणार आहे. तसेच श्रीलंकेचा माजी कर्णधार दासुन शनाका याचाही 15 सदस्यीय संघात समावेश आहे. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज भानुका राजपक्षे मात्र राखीव म्हणून संघात असणार आहे. महत्वाचं म्हणजे श्रीलंकेच्या या संघाचे नेतृत्व वानिंदू हसरंगा करणार आहे.

टी20 विश्वचषक 2024 साठी श्रीलंकेचा संघ
वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (उपकर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, दानंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, दुष्मंथा नुस्खा, दुष्मंता चतुर्था, दुनिथ वेललागे, तुषारा, दिलशान मधुशंका.

राखीव खेळाडू : असिथा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, भानुका राजपक्षे, जनिथ लियानागे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---