आयर्लंड संघाचा श्रीलंका दौरा शुक्रवारी (28 एप्रिल) संपला. जयमान श्रीलंकन संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आयर्लंडला क्लीन स्वीप (2-0) दिली. मालिकेतील दोन्ही सामने गमावणाऱ्या आयर्लंडने पिहला सामना तिन दिवस, तर दुसरा सामना पाच दिवस खेळला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघ एक डाव आणि 10 धावांच्या अंतराने जिंकला. मात्र, याचसोबत भारतीय संघाचा एक मोठा विक्रम देखील श्रीलंकन संघाकडून मोडीत निघाला.
श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॅले स्टेडियमवर खेळला गेला. 24 एप्रिल रोजी सुरू झालेला हा सामना शेवटच्या दिवशी निकाली निघाला. पहिल्या डावात आयर्लंडने 492 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंका संघाने आपल्या पहिल्या डावात 704 धावा केल्या आणि 212 धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आयर्लंडला ही आघाडी मोडीत काढून मोठी धावसंख्या उभी करायची होती. शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आयर्लंडचा दुसरा डाव देखील गुंडाळला गेला. आयर्लंड संघ दुसऱ्या डावात 202 धावा करून सर्वबाद झाला. परिणामी श्रीलंकन संघाला एक डाव आणि 10 धावांनी विजय मिळाला.
विरोधी संघाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या केली असतानाही एक डाव राखून विजय मिळवण्याची कामगिरी यापूर्वी भारताच्या नावावर होती. मात्र, श्रीलंकन संघाने शुक्रवारी हा विक्रम मोडीत काढला. 2016 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. इंग्लंडने या सामन्यात पहिल्या डावात 477 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एक डाव आणि 75 धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात आयर्लंडने पहिल्या डावात 492 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकने एक डाव राखून विजय मिळवला.
दरम्यान, गॅले स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्याचा विचार केला, तर धावांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आय़र्लंडसाठी पहिल्या डावात पॉल स्टिर्लिंग याने 103, कर्टिस कॅम्फर याने 111, अँडी बालबिर्नीने 95 आणि वॉर्कन टकरने 80 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात श्रीलंकेसाठी दोन खेळाडूंनी द्विशतक आणि दोन खेळाडूंनी शतक ठोकले. निशाण मधुष्का आणि कुसल मेंडिस यांनी अनुक्रमे 205 आणि 245 धावांची वादळी खेळी केली. तसेच कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि ऍन्जलो मॅथ्यूज यांनी अनुक्रमे 115 आणि 100* असे योगदान दिले. (Sri Lanka broke India’s 9-year-old record by winning the second Test match against Ireland)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘धोनीविरुद्ध खेळून मला कोणताही दबाव जाणवत नाही, उलट…’, RRच्या मॅचविनर पठ्ठ्याचे मोठे विधान
जुनं ते सोनं! लिलावात दाखवला नाही भाव, पण विश्वास टाकणाऱ्या संघांसाठी चमकले ‘हे’ दिग्गज, यादी पाहाच