आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. पण देशातील क्रिकेट चाहत्यांची निराशा आणि क्रिकेटचे भविष्य लक्षात घेता आयसीसीने क्रिकेट खेळणे बंद करू नये, असे निर्देश देखील दिले होते. अशातच बुधवारी (13 डिसेंबर) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पुढच्या दोन वर्षांसाठी मुख्य निवडकर्ता आणि निवड समितीची नियुक्ती केली आहे.
आगामी वर्षात श्रीलंकन संघाला आपली पहिली मालिका झिम्बाब्वे विरुद्ध वनडे आणि टी-20 प्रकारात खेळायची आहे. 6 जानेवारी ते 18 जानेवारीदरम्यान या दोन मालिकांमधील सहा सामने खेळले जातील. या मालिकेसाठी संघ निवडण्याची जबाबदारी श्रीलंकेच्या नव्या निवड समितीवर आली आहे.
उपुथल थरंगा या निवड समितीचे अध्यक्ष बनले आहेत. तसेच चार सदस्यांच्या रुपात दिलरुवान परेरा, थरंगा परानाविथाना, अंजता मेंडिस आणि इंडिका डी सेराम यांना निवडले गेले आहे. क्रीडा मंत्री हरिन फर्नांडो यांनी या सर्वांची निवड समितीवर तत्काळ नियुक्ती केली आहे. फर्नांडो यांनीच मंगळवारी (12 डिसेंबर) क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय मागे घेतला होता. निवड समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
Sri Lanka Cricket wishes to announce a new ‘Cricket Selection Committee’ for a period of
two years to select national teams.The appointment of the new committee, which comes into immediate effect, was made by the
Honorable Minister of Sports and Youth Affairs, Harin Fernando. pic.twitter.com/CvHgeYX5LO— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) December 13, 2023
उपुल थरंगाने श्रीलंकन संघासाठी तिन्ही प्रकारांमध्ये क्रिकेट खेळले आहे. त्याने श्रीलंकेसाठी 31 कसोटी सामन्यांमध्ये 1754 धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये 235 वनडे सामन्यात 6951 धावांचे योगदान संघासाठी दिले. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी 407 धावांचे योगदान दिले, पण यासाठी त्याला 26 सामने खेळावे लागले. 2021 मध्ये थरंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता मुख्य निवडकर्त्यांच्या रुपात संघासाठी योगदान देणार आहे. दिग्गज फलंदाजाचा प्रत्यक्ष मैदानातील अनुभव येत्या काळात श्रीलंकन क्रिकेटसाठी फायदेशीर ठरू शकते.
निडव समितीचे सदस्य बनलेल्या अजंता मेंडिस यांनेही फिरकीपटूच्या रुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली झाप पाडली. श्रीलंकन संघासाठी मेंडिसने 19 कसोटी, 87 वनडे आणि 39 टी-20 सामन्यांमध्ये गोलंदाजी केली. (Sri Lanka Cricket announce new Selection Committee)
महत्वाच्या बातम्या –
महर्षी दयानंद महाविद्यालय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023 । महर्षी दयानंद महाविद्यालयाला दुहेरी विजेतेपद.
टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत दिग्गजाचं मोठं विधान; म्हणाला, ‘आयपीएलपासूनच त्याची…’