---Advertisement---

श्रीलंका क्रिकेटमध्ये भूकंप! सरकारच्या दबावामुळे एसएलसी प्रमुखांनी दिला राजीनामा

On: मंगळवार, एप्रिल 28, 2026 8:07 PM
---Advertisement---

श्रीलंका क्रिकेट बोर्डबद्दल मोठे वृत्त समोर येत आहे. नवीन नेतृत्व रचनेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी सरकारच्या दबावाखाली श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने मंगळवारी (२८ एप्रिल) राजीनामा दिला आहे. दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले शम्मी सिल्वा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारी समितीच्या राजीनाम्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये बदल दिसण्याची शक्यता आहे.

एलएससी अध्यक्ष शम्मी यांनी त्याच्या चौथ्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील ११ महिने शिल्लक असताना संपूर्ण समितीच्या राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी एक विशेष बैठक बोलावली. “अंतरिम व्यवस्थापन संघाला मार्ग मोकळा करून देण्यासाठी समितीने राजीनामा दिला”, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

श्रीलंकेचे राष्टपती अनुरा कुमार दिसानायके यांनी आठवड्याच्या अखेरीस संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यासंदर्भात आणि नवी शासनप्रणाली आणण्याबद्दल सिल्वा यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

श्रीलंका क्रिकेटवर मागील बऱ्याच काळापासून भ्रष्टाचार आणि प्रशासकिय गैरव्यवस्थापनाचे आरोप होत आहेत. ताज्या घडामोडीमुळे त्या कामकाजावर सुरू असलेल्या तपासणीमध्ये आणखी भर पडली आहे. आयसीसीने नोव्हेंबर २०२३ मध्ये मंडळाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे कारण देत एका श्रीलंकेचे सदस्यत्व निलंबित केले होते. स्वायत्तेचे आश्वासन मिळाल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये हे निलंबन मागे घेण्यात आले. यामुळे सिल्वा पुन्हा त्यांच्या पदावर रुजू झाले होते.

खेळाडूंच्या तक्रारी आणि नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ मध्ये संघाला लवकरच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले, ज्यामुळे व्यवस्थेत बदलाच्या मागणीला आणखी जोर आला. तसेच सिल्वा हे सलग चौथ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते, मात्र आता समोर आलेल्या माहितीमुळे श्रीलंका क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदलाचे संकेत देत आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे सिल्वा यांना पदावरून दूर करण्याच्या निर्णयावर आता आयसीसीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---