कोलंबो । भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेने आपला कसोटी संघ काल घोषित केला असून यातून कुशल मेंडिस आणि कौशल सिल्वा यांना वगळण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरपासून कोलकाता कसोटीने मालिकेची सुरुवात होणार आहे.
या संघाचे नेतृत्व दिनेश चंडिमलकडे देण्यात आले असून अष्टपैलू दसून शनका आणि धनंजया डे सिल्वा यांनी संघात पुनरागमन केले आहे.
दुखापतीतून सावरलेल्या अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथेवसला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यात सलग ९ सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते. त्यानंतर प्रथमच श्रीलंका संघ भारतासमोर येणार आहे.
कोलकाता कसोटीनंतर दुसरा सामना नागपूर येथे २४ नोव्हेंबर तर तिसरा सामना २ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
श्रीलंका संघ: दिनेश चांदिमल (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, धनंजय डीसिल्वा, सादिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, रंगना हेराथ, सुरंगा लकमल, दिलरूवान परेरा, लाहिरू गामागे, लक्षण संदाकन, विश्व फर्नांडो, दासुन शनाका, निरोशन डिकवेला, रोशन सिल्वा.