सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 साठी क्वॉलिफायर सामने खेळले जात आहे. सुपर सिक्स फेरीत पोहोचलेल्या श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघात रविवारी (2 जुलै) आमना सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने 9 विकेट्स राखून मोठा विजय मिळवला आणि वनडे विश्वचषकात आपण खेळणार, हे निश्चित केले. क्वॉलिफायर्समधील सहा पैकी सहा सामन्यांमध्ये श्रीलंकन संघ जिंकला आहे.
वनडे विश्चषकाच्या क्वालिफायर सामन्यांमध्ये एकून दोन संघ निवडले जाणार आहेत, प्रत्यक्षात विश्वचषक स्पर्धा खेळू शकतील. क्वालिफायर सामने ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन ग्रुपमध्ये खेळले गेले. श्रीलंका संघ ग्रुप बीमध्ये होता. ग्रुप बीमधून सुपर सहामध्ये श्रीलंका स्कॉटलँड आणि ओमान हे तीन संघ पोहोचले. ग्रुप एमधील झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्ट इंडीज हे संघ सुपर सहामध्ये होते. यापैकी श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकवर होते. दोन्ही संघांनी क्वॉलिफायर्समधील आपले पहिले पाचही सामने जिंकले होते. मात्र, रविवारी (02 जुलै) श्रीलंकन संघाकडून झिम्बाब्वेचा विजयरथ रोखला गेला. (Sri Lanka vs Zimbabwe)
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघ 32.2 षटकांमध्ये 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 33.1 षटकात एका विकेटच्या नुकसानावर 169 धावा केल्या आणि विजय मिळवला. झिम्बाब्वेसाठी सीन विलियम्स यानेही याही सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली. त्याने 57 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निसांका याने नाबाद 101 धावा कुटल्या. दिमूथ करुणारत्ने याने 30, तर कुसल मेंडीसने 25* धावांचे योगदान दिले.
विजयात श्रीलंकेच्या गोलंदाजी विभागाचे योगदान महत्वाचे राहिले. महिशा थिक्षाणा याने 8.5 षटकांमध्ये 25 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. दिलशान मधुशंका यानेही 5 षटकात 15 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. मथिशा पथिराना 3 षटकात 18 धावा देत दोन, तर दासून शनानाने 1 विकेट मिळवली. (Sri Lanka have ???????????????????????????????????? for the 2023 World Cup)
महत्वाच्या बातम्या –
विश्चचषकाचे यजमानपद न मिळालेल्या राज्यांसाठी बीसीसीआयचा प्लॅन, जय शहांनी लढवली शक्कल
वनडे विश्वचषकातून बाहेर पडताच वेस्ट इंडिज संघात भूकंप, कर्णधार होपने कुणालाच नाही सोडले; म्हणाला…