रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ सज्ज झाले आहेत. उभय संघातील हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक उधळली, पण श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने विजय मिळवला. यावेळी त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ श्रीलंकेला धूळ चारत 8व्यांदा आशिया चषक स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करेल, तर श्रीलंका 7व्यांदा चषक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
श्रीलंका संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक बदल केला आहे. महीश थीक्षणा बाहेर पडला असून त्याच्या जागी दुशन हेमंथा (Dushan Hemantha) याची संघात एन्ट्री झाली आहे. तसेच, मागील सामन्यात ज्या 5 भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, त्या खेळाडूंचे या सामन्यात पुनरागमन झाले आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यालाही संघात जागा देण्यात आली आहे. त्याला दुखापतग्रस्त अक्षर पटेल याच्या जागी संघात घेतले आहे. (Sri Lanka have won the toss and have opted to bat against india asia cup 2023 final)
🚨 Toss & Team News from Colombo 🚨
Sri Lanka have elected to bat against #TeamIndia in the #AsiaCup2023 Final.
Here's our Playing XI 🙌 #INDvSL
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN pic.twitter.com/tzLDct6Ppb
— BCCI (@BCCI) September 17, 2023
आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी उभय संघ
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका संघ
पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना
हेही वाचा-
भारताला भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार, वनडे मालिकेसाठी संघ घोषित
तिशीतील दिग्गजाचा घरच्या मैदानावरील वनडे करिअरचा शेवटचा सामना; म्हणाला, ‘माझं शरीर म्हणतंय मी 40चा…’