---Advertisement---

मोठी बातमी! वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजावर ICCची कारवाई, काय होती चूक?

On: रविवार, जुलै 2, 2023 2:34 PM
Wanindu-Hasaranga
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी बोर्डाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायरमधील सुपर 6 फेरीतील दुसरा सामना शुक्रवारी (दि. 30 जून) श्रीलंका विरुद्ध नेदरलँड संघात पार पडला. या सामन्यादरम्यान हसरंगाने नेदरलँडविरुद्ध विनाकारण आक्रमकता दाखवली होती. आता आयसीसीने यावर निवेदन जारी केले आहे.

आयसीसीने (ICC) निवेदन जारी करत म्हटले की, वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) सामन्यादरम्यान क्रिकेटच्या वस्तू, कपडे, किंवा मैदानात लागलेल्या वस्तूंशी संबंधित आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. खरं तर, हसरंगाने सामन्यात बाद झाल्यानंतर तंबूत परत जात होता. यावेळी त्याने सीमारेषेवर लावलेल्या होर्डिंग्सवर बॅट मारली होती. अशात हसरंगाने त्याची चूक मान्य केले आहे. यानंतर त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुण जोडला गेला.

मागील 24 महिन्यात असे दुसऱ्यांदा घडले आहे. आता त्याच्या खात्यात 2 डिमेरिट गुण जोडले गेले आहेत. खरं तर, 1 स्तरावरील या आरोपात कमीत कमी अधिकृतरीत्या खेळाडूंना फटकारत चेतावणी दिली जाते. तसेच, अधिकतर खेळाडूंवर सामना शुल्काच्या 50 टक्के दंड ठोठावला जातो.

श्रीलंकेची कामगिरी
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) क्वालिफायर फेरीविषयी बोलायचं झालं, तर श्रीलंका संघाने शानदार कामगिरी केली आहे. संघ सुपर 6 फेरीत 6 गुणांसह अव्वलस्थानी आहे. श्रीलंकाने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सला हरवले होते. या सामन्यात हसरंगाने चांगली गोलंदाजी केली होती. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 53 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या होत्या.

हसरंगाच्या क्वालिफायर फेरीतील वैयक्तिक कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 5 सामन्यात सर्वाधिक 20 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यादरम्यान हसरंगाने एक नाही, तर 3 वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही गाजवला आहे. (sri lanka spinner wanindu hasaranga reprimanded for violating icc code of conduct icc wc 2023 qualifier)

महत्वाच्या बातम्या-
स्टार्कच्या कॅचवर टीव्ही पंचांचा Not Out निर्णय, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने फटकारत म्हटले, ‘हा मोठा मूर्खपणा…’
ऍशेसमध्ये पुन्हा कॅच कॉन्ट्रोव्हर्सी! स्टार्कने टिपलेल्या ‘त्या’ झेलावरून माजले रणकंदन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---