वनडे विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विश्वचषक संघासाठी आपला संघ घोषित कऱण्याची शेवटची तारख 28 सप्टेंबर आहे. त्याआधी दोन दिवस म्हणजेच मंगळवारी (26 सप्टेंबर) श्रीलंकेचा विश्वचषक संघ घोषित केला गेला. विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय श्रीलंकन संघात त्यांचे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे सामील केले गेले नाहीत.
Sri Lanka reveals its squad for the ICC Men’s Cricket World Cup 2023!
Let’s rally behind the #LankanLions ????????#CWC23 pic.twitter.com/niLO7C7RPY
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) September 26, 2023
(Sri Lanka squad announced for ODI World Cup 2023)
विश्वचषकासाठी निवडलेला श्रीलंका संघ –
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुशन हेमंथ, महीश तीक्षणा, दुनिथ वेलालगे, कसुन रजिथा, मथीश पथिराना, लहिरु कुमारा आणि दिलशान मदुशंक.
विश्वचषकासाठी निवडलेल्या श्रीलंकन संघात त्यांचा प्रमुख अष्टपैलू खेलाडू वानिंदू हसरंगा नाहीये. लंका प्रीमियर लीग 2023 मध्ये हसरंगाला दुखापत झाली होती. याच कारणास्तव संघासाठी तो एलपीएलचा अंतिम सामना खेळू शकला नव्हता. असे असले तरी हंगामातील अप्रतिम प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. हसरंगा प्रतिनिधित्व करत असलेल्या बी-लव कँडी संघाने लंगा प्रीमियर लीगची यावर्षीची ट्रॉफी जिंकली. हसरंगा पुढे याच दुखापतीमुळे आशिया चषक खेळू शकला नव्हता. अशातच आता विश्वचषक संघातून त्याचे नाव वगळल्याने संघ आणि चाहत्यांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमिरा देखील दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषक संघाचा भाग नाहीये.
महत्वाच्या बातम्या –
विश्चचषक ट्रॉफीच्या मरवणुकीत पावसाची हजेरी, पुण्यातील ‘FC Road’वर चाहत्यांचा झिंगाट डान्स
अभिमानास्पद! चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने घोडेस्वारीत जिंकलं गोल्ड मेडल