पल्लेकेले येथे भारताविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये सामना गमावल्यानंतर श्रीलंकेच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. हा असा विक्रम आहे, जो कोणताही संघ मोडू इच्छिणार नाही.
श्रीलंकेला भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. तिसऱ्या सामन्यात तर भारतानं लंकेच्या जबड्यातून विजयाचा घास हिसकावला. अशाप्रकारे, श्रीलंकेच्या नावे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पराभवाची नोंद झाली आहे. आता श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक वेळा पराभवाचा सामना करणार संघ बनला आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 5 संघांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी टी20 मध्ये सर्वाधिक पराभव पाहिले आहेत.
(5) न्यूझीलंड – टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघाच्या यादीत न्यूझीलंडचं नाव सामील आहे. 2024 टी20 विश्वचषकात न्यूझीलंडची कामगिरी खूपच खराब होती. न्यूझीलंडनं आतापर्यंत 99 टी20 सामने गमावले आहेत, ज्यापैकी 7 पराभव सुपर ओव्हरमध्ये झाले आहेत.
(4) झिम्बाब्वे – या यादीत झिम्बाब्वेच्या संघाचाही समावेश आहे. न्यूझीलंडप्रमाणे या संघालाही टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 99 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. अलीकडेच टीम इंडियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेला 4 वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
(3) वेस्ट इंडिज – दोन वेळचा टी20 विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजचा संघ या फॉरमॅटमध्ये तज्ञ मानला जातो. परंतु काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी फारशी काही चांगली राहिलेली नाही. कॅरेबियन संघानंही आतापर्यंत 99 टी20 सामने गमावले असून सर्वाधिक सामने गमावलेल्या संघांच्या यादीत संघ नाव तिसऱ्या स्थानावर आहे.
(2) बांग्लादेश – बांग्लादेशच्या संघानं आतापर्यंत एकूण 104 टी20 आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत ते दुसऱ्या स्थानी आहे.
(1) श्रीलंका – भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेनं बांग्लादेशचा टी20 मध्ये सर्वाधिक पराभवांचा विक्रम मोडला. आता श्रीलंकेच्या नावावर टी20 मध्ये सर्वाधिक 105 पराभवांची नोंद झाली आहे.
हेही वाचा –
श्रीलंकेविरुद्ध रिंकू सिंहला 19वा ओव्हर का दिला? कर्णधार सूर्यानं सांगितला ‘मास्टर प्लॅन’!
रिंकूचं 19वं षटक, सूर्याचं 20वं षटक अन् सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये गेम केला! भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा संपूर्ण थरार
रिंकू-सूर्याची गोलंदाजी अन् सामना टाय! भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचा रोमहर्षक शेवट