fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

काल सुरु झालेली मोठी क्रिकेट लीग आज २ मॅचनंतर झाली रद्द, कारण आहे अतिशय वेगळे

मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या सर्वच मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.  काही देशात टी 10 लीग आणि टी 20 लीगच्या माध्यमातून क्रिकेटला सुरुवात होत आहे. लवकरच इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान, श्रीलंका येथे सोमवारपासून UVA टी20 प्रीमियर लीग सुरुवात झाली. पहिले दोन सामने खेळल्यानंतर सर्व लीग रद्द करण्यात आली.

श्रीलंका येथे सोमवारपासून सुरु झालेल्या UVA टी20 प्रीमियर लीगमध्ये चार संघ खेळणार होते. एक आठवडा चालणारी ही लीग पहिल्याच दिवशी रद्द करण्यात आली.  श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या लीगला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ही लीग रद्द करण्यात आली. या लीगमध्ये तिलकरत्ने दिलशान, परवेझ मेहरू, अजंता मेंडिस, शनाका सारखे खेळाडू खेळणार होते.

श्रीलंकेत रद्द होणारी ही दुसरी लीग आहे. यापूर्वी पीडीसी टी 10  ही लीग 25 जूनपासून सुरू होणार होती. या लीगमध्ये नुवान कुलसेकरा आणि अजंता मेंडीस सहभागी होणार होते. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या लीगला देखील मान्यता दिली नव्हती.  त्यामुळे फॅन्सला क्रिकेटचा रोमांच पाहण्यासाठी आता आशिया चषकाची वाट पाहावी लागणार आहे.

श्रीलंकेचा क्रिकेट संघ पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार आहे. सध्या हा संघ कँडी येथे सराव करत आहे. सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफ सरावामध्ये व्यस्त आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड येथे क्रिकेटची मालिका तसेच आयपीएल आणि आशिया चषक स्पर्धा भरविण्याच्या तयारीत आहेत. पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दुसरा देश येथे येण्यासाठी तयार नाही.

नुकतेच भारत आणि बांगलादेश संघाने श्रीलंकेचा दौरा रद्द केला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या संघाने देखील श्रीलंका दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

You might also like