---Advertisement---

पावसामुळे सामना गेला वाया! तरीही अफगाणिस्तानला मिळाले 2023 वर्ल्डकपचे तिकीट, श्रीलंकेच्या वाढल्या अडचणी

On: सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 10:22 AM
Afghanistan Team v Sri Lanka
---Advertisement---

अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी एकामागोमाग आनंदाच्या बातम्या मिळत आहेत. पहिले तर त्यांना पुढील पाच वर्षासाठी युएईचे क्रिकेट ग्राऊंड होम ग्राऊंड म्हणून मिळाले आहे. आता तर त्यांना वनडे विश्वचषक 2023चे तिकीटही मिळाले आहे. दुसरीकडे श्रीलंका संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अफगाणिस्तान-श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे.

आयसीसी पुरूष विश्वचषक सुपर लीगमध्ये अफगाणिस्तान रविवारी (27 नोव्हेंबर) श्रीलंकेशी भिडला. मालिकेतील दुसरा वनडे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात पावसाने व्यत्यत आणला आणि सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अफगाणिस्ताने फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीपुढे थोडे अडखळतच खेळले. सलामीवीर-विकेटकीपर रहमनुल्लाह गुरबाझ याने 67 धावा, रहमत शाह याने 58 आणि मोहम्मद नबी याने 41 धावा केल्याने अफगाणिस्तानचा संघ 48.2 षटकातच 228 धावसंख्येवर सर्वबाद झाला. श्रीलंकेचा डाव सुरू असताना 2.4 षटके टाकली असता धावसंख्या 10 झाली होती आणि पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने सामना शेवटी रद्द करण्याक आला.

https://twitter.com/ICC/status/1596890455601745920?s=20&t=YO2b_Uk0Eku-KXTlutnarg

सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाला प्रत्येकी 5-5 अंक मिळाले. अफगाणिस्तानला 5 अंक मिळाले, ज्यामुळे त्यांचे एकूण अंक 115 झाले. यामुळे ते विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले. विश्वचषकास पात्र होण्यासाठी लीगच्या गुणतालिकेत पहिल्या आठमध्ये असणे आवश्यक आहे. अफगाणिस्तान सातव्या स्थानावर पोहोचल्याने ते या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत 67 अंकासह दहाव्या स्थानावर राहिला.

श्रीलंका संघाला आणखी चार सामने खेळायचे बाकी आहेत, हे सर्व सामने जिंकले तरच त्यांच्याकडे विश्वचषकास पात्र होण्याची संधी आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. कारण या सामन्यात जो जिंकेल त्याला 10 अंक मिळणार आहे. या सामन्यात स्पिनर्सकडून श्रीलंकेला अधिक आशा असणार आहे, कारण रविवारी झालेल्या सामन्यात महिश तिक्क्षणा, वानिंदू हसरंगा आणि धनंजया डी सिल्व्हा यांनी विकेट्स तर घेतल्याच त्याचबरोबर त्यांनी कमी धावाही दिल्या.

https://twitter.com/ICC/status/1597078977155211264?s=20&t=YO2b_Uk0Eku-KXTlutnarg

भारतात 2023चा विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यामुळे ते आधीच स्पर्धेत पात्र ठरले आहेत. Sri Lanka vs Afghanistan, 2nd ODI no result due to rain And Afghanistan qualify for 2023 World cup

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WORLD CUP: चार वेळेचा ‘चॅम्पियन’ जर्मनीची डोकेदुखी वाढली! स्पेनविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत
‘हा’ फलंदाज घेऊ शकतो रिषभ पंतची जागा, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---