---Advertisement---

भावा, लवकर बरा हो! श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजासाठी अँजलो मॅथ्यूजची खास पोस्ट

On: शुक्रवार, सप्टेंबर 2, 2022 9:16 PM
Kusal
---Advertisement---

संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022 स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेने गुरूवार (1 सप्टेंबर) साखळी फेरीत बांगलादेशला 2 विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे श्रीलंकेचा संघ फॉर्ममध्ये दिसत आहे. यातच त्यामध्ये आणखी एका खेळाडूची भर पडणार आहे. त्यांचा महत्वाच्या खेळाडूवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रियेतून पार पडली आहे. यामुळे श्रीलंकेची बाजू आणखी तगडी ठरणार आहे.

श्रीलंका संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल परेरा (Kusal Perera) याची युनायटेड किंग्डम (युके) येथे खांद्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. असे झाले असले तरी त्याच्या संघपुनरागमनात थोडा अधिक काळाचा अवधी लागणार आहे. यामुळे तो अप्रत्यक्षरित्या आगामी टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ही आयसीसी स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे.

कुसलने श्रीलंकेकडून 22 कसोटी, 107 वनडे आणि 60 टी20 सामने खेळले आहेत. तो सध्या हॉस्पिटलमध्ये असून त्याने लवकर बरे व्हावे अशी पोस्ट त्याचा संघसहकारी अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने ट्विटरवर शेयर केले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डने (एसएलसी) न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि युके येथिल डॉक्टरांची अंतिम यादी केली होती. तर कुसलने युकेमध्ये उपचार घेण्याचे ठरवले. त्याने इंग्लंडमधील अँड्रयू वॉलन्स यांच्याकडून उपचार घेतले. वॉलन्स हे खेळांमधील दुखापतींवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्या हाताच्या कोपऱ्यावर उपचार केले होते.

सुरूवातीला कुसलच्या उपचारावर एसएलसी खर्च करणार नाही अशा वृत्तांना पेव फुटले होते. तर बोर्डने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. श्रीलंका बोर्डचे वैद्यकिय पथक यांनी कुसलवर 12 आठवड्याचे रिहॅबिलिटेशन प्रोग्राम तयार केले. त्याने पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी लवकरात लवकर फिट व्हावे, असे बोर्डने जुलैमध्ये सांगितले.

टी20 विश्वचषकाला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तर बोर्डने त्याच्या फिटनेसबाबत कोणताही रिपोर्ट दिलेला नाही. कुसल हा मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात जखमी झाला होता. मात्र तो टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेत खेळत राहिला. या स्पर्धेनंतर त्याने राष्ट्रीय संघासाठी एकही सामना खेळला नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन
पाकिस्तानी दिग्गज झालाय सूर्याच्या खेळाचा चाहता! स्वत: केले त्याच्या खेळीचे कौतुक
‘राहुल रोहितपेक्षा चांगला खेळाडू आहे फक्त…’, भारताच्या माजी दिग्गजाने केलेल्या वक्तव्याने खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---