न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना श्रीलंका संघाने शानदार पद्धतीने आपल्या नावावर केला. श्रीलंकेने न्यूझीलंडला पहिल्याच वनडेत 9 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. श्रीलंका संघाने न्यूझीलंड महिला संघाला क्रिकेट इतिहासातील कोणत्याही प्रकारात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणत्याही क्रिकेट प्रकारात श्रीलंका महिला संघ न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवू शकला नव्हता.
श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला (Sri Lanka Women vs New Zealand Women) संघातील पहिला वनडे सामना गाले मैदानावर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 28 षटकेच खेळला गेला. न्यूझीलंड संघाने निर्धारित 28 षटकात 5 विकेट्स गमावत 170 धावा केल्या होत्या. यावेळी अमेलिया केर हिने सर्वाधिक 40 धावांचे योगदान दिले होते.
पहिल्यांदाच केला न्यूझीलंडचा पराभव
या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने मजबूत सुरुवात केली. श्रीलंकेची सलामीवीर फलंदाज चमारी अटापट्टू (Chamari Athapaththu) आणि विशमी गुणरत्ने यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी तब्बल 159 धावांची भागीदारी केली. यासोबतच त्यांनी आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. कर्णधार अटापट्टूने नाबाद 108 धावांची खेळी साकारली. तसेच, गुणरत्ने 74 चेंडूत 50 धावा करून बाद झाली. अशाप्रकारे श्रीलंका महिला संघाने कोणत्याही क्रिकेट प्रकारात न्यूझीलंडला पहिल्यांदाच पराभूत केले.
या ऐतिहासिक विजयात कर्णधार अटापट्टू हिनेदेखील इतिहास रचला. ती वनडे क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारी श्रीलंका संघाची पहिलीच महिला क्रिकेटपटू बनली. तिने डावाच्या 13व्या षटकात हा कारनामा केला. यासोबतच तिने सातवे वनडे शतकही झळकावले. तिने 83 चेंडूंचा सामना करताना 5 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 108 धावांची शतकी खेळी साकारली.
???? History made! Sri Lanka women claim their first-ever victory against New Zealand in any cricket format ????????????????#SLvNZ #LionessRoar pic.twitter.com/4o9kRd8ufu
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) June 27, 2023
चमारी अट्टापटूची वनडे कारकीर्द
चमारी अटापटू हिने श्रीलंकेचा महिला संघाकडून आतापर्यंत 93 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 33.61च्या सरासरीने 3059 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, अटापट्टू 2023मध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. तिने 3 वनडे सामन्यात 109.50च्या सरासरीने आणि 121.66च्या स्ट्राईक रेटने 219 धावा केल्या आहेत. (sri lanka women team claim their first ever victory against new zealand in any cricket format know here)
महत्वाच्या बातम्या-
श्वास रोखून धरा! लॉर्ड्समध्ये लायन रचणार 2 मोठे विक्रम, एक रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच नाही जमला
‘फायनलमधील धोनीच्या रणनीतीविषयी मला माहिती होतं…’, मुथय्या मुरलीधरनचा मोठा खुलासा