श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवार रोजी (०७ सप्टेंबर) वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम वनडे सामना पार पडला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकाने ७८ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयासह त्यांनी २-१ च्या फरकाने वनडे मालिकाही जिंकली आहे. श्रीलंकेचा पदार्पणवीर माहिश थिक्षाना याचा संघाच्या विजयात मोठा हात राहिला. यासह तब्बल १८ महिन्यांनंतर श्रीलंकेने वनडे मालिका जिंकली आहे.
प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ विकेट्स गमावत श्रीलंकाने २०३ धावा फलकावर नोंदवल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ३० षटकातच १२५ धावांवर गारद झाला.
श्रीलंकेच्या २०४ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज साध्या ३० धावांचा आकडाही गाठू शकला नाही. दक्षिण आफ्रिकाकडून यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेनने सर्वाधिक २२ धावा केल्या. ३० चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर जानेमन मलान आणि जॉर्ज लिंडे यांनी प्रत्येकी १८ धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेकडून २१ वर्षीय फिरकीपटू थिक्षानाने सर्वाधिक ४ विकेट्स चटकावल्या. १० षटके गोलंदाजी करताना ३७ धावा देत त्याने ही कामगिरी केली. त्याच्याबरोबर दुष्मंथा चमीरा आणि वानिंदु हसरंगा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Dream debut for Maheesh Theekshana 🤩
His four-for helps Sri Lanka seal the series with a comfortable 78-run win over South Africa in the final ODI 👏#SLvSA | https://t.co/TGt8VRPSar pic.twitter.com/5mf3mhi8Nb
— ICC (@ICC) September 7, 2021
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज चरिथ असलांकाने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. ७१ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. त्याच्या जोडीला धनंजया डी सिल्वा (३१ धावा) आणि दुष्मंथा चमीरा (२९ धावा) यांनीही योगदान दिले. श्रीलंकेच्या फलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे संघ २०३ धावांपर्यंत मजल मारू शकला होता.
दक्षिण आफ्रिकाकडून कर्णधार केशव महाराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. तर जॉर्ज लिंडे आणि तरबेज शम्सी यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले होते.
V I C T O R Y 🙌
Sri Lanka win by 78 runs and clinch the series 2-1 🇱🇰🇱🇰
Scorecard: https://t.co/KhzQddfp8V
-Cycle Pure Incense Cup Sri Lanka v South Africa series Powered by Daraz-#CycleIncense #SLvSA pic.twitter.com/PXQSsFXipP
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 7, 2021
श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराला त्याच्या कामगिरीसाठी तिसऱ्या वनडेचा सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर संपूर्ण वनडे मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या चरिथ असलांकाला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन कोहली पुन्हा तोडणार लाखो चाहत्यांची मने? अश्विनच्या पाचव्या कसोटीतील स्थानाविषयी दिले संकेत
महिला टी२० रँकिंगमध्ये भारतीयांचा दबदबा, शेफाली अव्वलस्थानी कायम; स्म्रीती, दिप्तीही भारीच!
भारताच्या ओव्हलवरील थरारक विजयानंतर कैफचा जबरदस्त ‘नागिन डान्स’, व्हिडिओवरुन नाही हटणार नजर