श्रीलंका क्रिकेट संघाचा ३९ वर्षीय अष्टपैलू खेळाडू दिलरुवान परेरा (Dilruwan parera) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय कारकीर्द २००७ मध्ये सुरू झाली होती. त्याच्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ४३ कसोटी सामने, १३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांमध्ये श्रीलंका संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याने ११७ विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या, तसेच फलंदाजीत १४५६ धावा ठोकल्या.
दिलरुवान परेराने क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याची माहिती देण्यासाठी श्रीलंका क्रिकेटचे सीईओ एशले डी सिल्वा यांना ईमेल केला. दिलरुवानच्या मते, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा ही सर्वात योग्य वेळ आहे. परंतु देशांतरत क्रिकेटमध्ये तो पुढच्या काही दिवसांपर्यंत खेळताना दिसणार आहे. दिलरुवानने स्वतः या सर्व गोष्टींची माहिती दिली.
निवृत्तीची घोषणा करताना तो म्हणाला की, “श्रीलंका क्रिकेट नेहमीच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहे आणि मी तुमचा, कार्यकारी समितीचा आणि माझ्या मागच्या आणि सध्याच्या प्रशिक्षकांचा आभारी आहे.” पुढे बोलताना दिलरुवान म्हणाला की, “मी काही काळापर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळत राहील. पण मला वाटते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास थांबवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मला खेळात काही सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आणि सन्मान मिळाला आहे. मी चांगल्या आठवणी आणि आनंदाने भरलेल्या मनसोबत चाललो आहे.”
दिलरुवानने जरी २००७ मध्ये श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असले, तरी त्याला संघासोबत खेळण्याच्या अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. दिग्गज मुथैया मुरलीधरन आणि रंगना हेराथमुळे त्याला अनेकदा संघाच्या बाहेर बसावे लागले. तरही त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मुरलीधरनच्या एका महत्वाच्या विक्रमाला मोडीत काढले होते. श्रीलंका संघासाठी सर्वात वेगवान १०० कसोटी विकेट्स घेण्याचा मुरलीधरनचा विक्रम दिलरुवानने २०१७ साली मोडला होता. भारताचा सलामीवीर शिखर धवनची विकेट घेऊन त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःच्या १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
सलग ६० दिवस मॅरेथॉन धावण्याचा आशिष कासोदेकर यांचा जागतिक विक्रम
वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर
गोलंदाजी नाही, तर द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामागे ‘हे’ मोठे कारण, शमीने व्यक्त केले स्पष्ट मत
व्हिडिओ पाहा –