---Advertisement---

श्रीलंकेला पुण्यात होणाऱ्या टी२०आधी बसला मोठा झटका

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 7:33 PM
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध श्रीलंका संघात शुक्रवारी(10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे तिसरा आणि शेवटचा टी20 सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा डावखुरा वेगवान गोलंदाज इसुरु उदाना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आता शुक्रवारच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

मंगळवारी दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान भारतीय संघ श्रीलंकेने दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याआधी झालेल्या सराव सत्रात उदानाला पाठीची दुखापत झाली. त्यामुळे त्याला या सामन्यात गोलंदाजी करता आली नाही.

श्रीलंकेने गोलंदाजीला उतरण्यापूर्वी मंगळवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान 143 धावाचा बचाव करताना उदानाला श्रीलंकेकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या आधीच त्याला पाठीची दुखापत झाली.

श्रीलंकेने हा सामना सात गडी राखून गमावला आणि त्यामुळे ते तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1 अशी पिछाडीवर आहेत.

तसेच श्रीलंकेचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थरला उदाना बाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाही, जो अलीकडच्या काळात श्रीलंकेच्या मुख्य टी20 गोलंदाजांपैकी एक आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1214907368233783296

https://twitter.com/Maha_Sports/status/1214857005468307456

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---