---Advertisement---

श्रीरामचे देशप्रेम! ऑस्ट्रेलियन संघासह पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास श्रीधरन श्रीरामचा नकार

On: बुधवार, फेब्रुवारी 23, 2022 7:49 AM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे दोन्ही देश एकमेकांसोबत क्रिकेट खेळत नाहीत. विश्वचषक व आयसीसीच्या स्पर्धेतील सामने वगळता भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र जाऊ शकत नाही, असे अनेक भारतीय खेळाडू उघडपणे सांगतात. २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचे टाळले होते. मात्र, आता पाकिस्तानमध्ये क्रिकेट हळूहळू रुळावर येत आहे. २४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विश्वविजेता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, हा दौरा सुरू होण्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी संघासह पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.

श्रीराम हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. गेल्या ५ वर्षात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, श्रीधरन श्रीराम यांच्या नकारानंतर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने पाकिस्तान दौऱ्यासाठी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाला श्रीधरन श्रीरामची उणीव नक्कीच भासणार आहे.

हा दिग्गज घेऊ शकतो जागा
श्रीधरन श्रीराम यांच्या जागी न्यूझीलंडचा महान फिरकीपटू व माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीचे नाव घेतले जात आहे. श्रीरामच्या जागी प्रशिक्षक म्हणून व्हिटोरीचा समावेश करण्यास ऑस्ट्रेलियन व्यवस्थापन उत्सुक दिसत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही

अशी राहिली आहे कारकीर्द
श्रीधरन श्रीराम भारतासाठी ८ वनडे खेळले आहेत. श्रीराम यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द विशेष नव्हती. अष्टपैलू श्रीराम यांनी आपल्या कारकीर्दीत ९ बळी मिळवले होते. श्रीराम हे देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव होते. त्याच्या नावे दहा हजारपेक्षा जास्त प्रथमश्रेणी धावा जमा आहेत. श्रीधरन श्रीराम यांनी कोलकाता नाईट रायडर्सकडून दोन आयपीएल सामने देखील खेळले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांना प्रशिक्षणही दिले होते. मागील पाच वर्षापासून ते ऑस्ट्रेलियन संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. ऑस्ट्रेलियाने मागील वर्षी जिंकलेल्या टी२० विश्वचषकाच्या विजयाचे श्रेय त्यांना दिले जाते.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला दुहेरी धक्का! चहरपाठोपाठ फॉर्मात असलेला सूर्यकुमार दुखापतग्रस्त; टी२० मालिकेतून झाला ‘आऊट’ (mahasports.in)

श्रीलंकेविरुद्ध ‘अशी’ असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन; तीन बडे खेळाडू करणार पुनरागमन (mahasports.in)

ना डॉक्टर.. ना औषधे.. ना दर्जेदार जेवण; खडतर परिस्थितीवर मात करत यंग इंडियाने जिंकला विश्वचषक (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---