चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेला सुरू होण्यास आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी आपापली तयारी सुरू केली असून, आशियाचा विजेता बनण्यासाठी एकूण सहा संघ ताकद आजमावताना दिसतील. मात्र, या अति महत्त्वाच्या स्पर्धेआधी सुरू झालेले खेळाडूंचे दुखापतीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. भारताचा जसप्रीत बुमराह व पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर, आता श्रीलंकेचा ही प्रमुख वेगवान गोलंदाज या आशिया चषकात खेळताना दिसणार नाही.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी आशिया चषकात खेळणार नसल्याचे भारतीय संघाची निवड झाली तेव्हाच समजले होते. पाकिस्तान संघाच्या घोषणेनंतर काही दिवसांनी शाहीन आफ्रिदी आशिया चषकात सहभागी होणार नाही, हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. आशियातील दोन सर्वोत्तम वेगवान गोलंदाज नसल्याने विरोधी संघांनी थोडाफार सुटकेचा विश्वास टाकला होता. त्याचवेळी श्रीलंकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला दुष्मंता चमिराही आता आशिया चषकात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीलंका संघाची निवड झाली तेव्हा स्पष्ट करण्यात आले की, सर्व दरम्यान त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून, तो आशिया चषकात सहभागी होणार नाही. त्याच्याजागी नुवान तुषाराचा संघात समावेश केला गेला आहे.
श्रीलंका आशिया चषक स्पर्धेत ब गटाचा भाग आहे आणि त्यांच्या मोहिमेची २७ ऑगस्ट रोजी दुबईत सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यांचा दुसरा सामना १ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध होईल.
आशिया चषकासाठी श्रीलंका संघ-
दसून शनाका (कर्णधार), धनुष्का गुणथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चारिथ असालंका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, जेफ्री प्रवेन चॅरान्का, कर्वेन चॅरकामी, कर्वेन चाँदरा, दिलशान मधुशंका, मथीशा पाथिराना, नुवानिडू फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चंडिमल
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! भारत पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेचाही प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर
‘त्याची उणीव जाणवणार नाही’, बुमराहच्या अनुपस्थितीबाबत माजी दिग्गजाचे मोठे विधान
आशिया चषकादरम्यान ‘हे’ भारतीय दिग्गज करतील हिंदी भाषिकांचे मनोरंजन, पाहा संपूर्ण यादी