मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. स्पर्धेतील या 33 व्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही. फलंदाजांनी 357 धावा उभ्या केल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 55 धावांवर गुंडाळत 302 धावांनी विजय मिळवला. या लाजिरवाण्या पराभवानंतर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या सामन्यात श्रीलंका संघ कोणत्याही प्रकारचा संघर्ष करू शकला नाही. 358 धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ केवळ 55 धावांमध्ये सर्वबाद झाला. संघाच्या या कामगिरीबाबत आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सपोर्ट स्टाफ, निवड समिती व कर्णधाराला प्रश्न विचारले आहेत. तसेच ही सर्व उत्तरे ही अत्यंत सविस्तरपणे देण्यास सांगितले आहे.
भारत-श्रीलंका सामन्यात फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या दरम्यान श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षणही अत्यंत खराब झाले होते. भारतीय फलंदाजांनी 357 धावा उभारल्यानंतर, त्यांचे सर्व प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतले. त्यांच्या तळाच्या तीन फलंदाजांनीच केवळ दुहेरी आकडा गाठला होता.
श्रीलंका संघाची या विश्वचषकातील सुरुवात अत्यंत खराब राहिली होती. त्यांनी पहिले तीन सामने गमावल्यानंतर दोन विजय मिळवले. मात्र, अफगाणिस्तान व भारत यांनी त्यांना पुन्हा एकदा पराभूत केल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तसेच श्रीलंका संघाचा नियमित कर्णधार दसुन शनाका व लाहिरु कुमारा हे दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडले आहेत.
(Srilanka Cricket Board Want Brief Explanation From Support Staff After Loss Against India)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर 22 यार्डस संघ विजयी
ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीजमध्ये देशतून 200हून अधिक खेळाडू सहभागी