---Advertisement---

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ! विश्वचषकाच्या तोंडावर दिग्गजाला दिला नारळ

On: सोमवार, सप्टेंबर 19, 2022 11:45 PM
Sri Lanka Team
---Advertisement---

मागील काही वर्षांपासून सातत्याने रसातळाला चाललेले श्रीलंका क्रिकेट पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. श्रीलंकेने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना विजेतेपद पटकावून याची सुरुवात केली. विश्वचषकातही संघाकडून मोठी अपेक्षा असताना आता श्रीलंका क्रिकेटबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंका क्रिकेटचे संचालक म्हणून काम करत असलेले ऑस्ट्रेलियाचे दिग्गज प्रशिक्षक टॉम मूडी आपले पद सोडणार आहेत. श्रीलंका क्रिकेट आणि मूडी यांच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दीड वर्षांपूर्वी तीन वर्षाच्या कालावधीकरिता मूडी यांना क्रिकेट संचालक म्हणून पाचारण केले होते. मात्र, आता मुदतीपूर्वीच त्यांचा हा करार रद्द केला जात आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,

‘श्रीलंका क्रिकेट मुडी यांना देण्यात येणाऱ्या सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. मूडी यांना त्यांच्या ठराविक वार्षिक रकमेसह श्रीलंकेत आवश्यक त्या सर्व सुविधा श्रीलंका बोर्ड पूरवत होते. करार वेळीआधी संपन्न झाल्याने बोर्डाला मूडी यांना काही रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागेल. मात्र, पुढच्या खर्चापेक्षा हा पर्याय सुलभ असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे.”

टॉम मूडी हे यापूर्वी 2005 ते 2007 या काळात श्रीलंका संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने 2007 विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मूडी यांनी आयपीएल व इतर फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये देखील नाव कमावले. मूडी यांच्यानंतर श्रीलंका क्रिकेटचा पुढील संचालक म्हणून माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिक इन, पंत आऊट! दिग्गजाने निवडलीये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया, वाचा ओपनर कोण ते
टीम इंडियाविरूद्ध ‘बिग शो’ मॅक्सवेलची स्पेशल तयारी; पाहा व्हिडिओ
भारतीय युवा बॉक्सिर्सनी सर्बियातील गोल्डन ग्लोव्ह ऑफ व्होजवोडिना स्पर्धेत जिंकली 19 पदके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---