---Advertisement---

श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार

On: गुरूवार, सप्टेंबर 1, 2022 1:01 PM
Shakib-Al-Hasan-Dasun-Shanaka
---Advertisement---

आशिया चषक 2022 मधील 4 साखळी फेरी सामने पार पडले आहेत. या 4 सामन्यांनंतर 2 संघांनी सुपर-4 फेरीत जागा निश्चित केली आहे. भारताने अ गटातून आणि अफगाणिस्तानने ब गटातून सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर आता गुरुवारी (01 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात ‘करा अथवा मरा’ (Do Or Die Match) ची लढत रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर होणारा हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करेल. सुपर-4 मध्ये त्यांचा अफगाणिस्तानशी आमना सामना होईल. तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर पडेल.

अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ आशिया चषकातील ब गटाचा भाग आहेत. दसुन शनाकाच्या नेतृत्त्वाखालील श्रीलंका संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला 8 विकेट्सने पराभूत केले होते. तर बांगलादेशनेही त्यांचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला 7 विकेट्सने धूळ चारली होती.

त्यामुळे सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झालेले श्रीलंका आणि बांगलादेश संघ (Sri Lanka vs Bangladesh) आता त्यांच्या अखेरच्या साखळी फेरी सामन्यात आपले नशीब आजमावतील.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
तारीख आणि वेळ: गुरुवार 1 सप्टेंबर, संध्याकाळी 7.30 वाजता (नाणेफेक 7 वाजता)
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल

बांगलादेश आणि श्रीलंकेचे पूर्ण संघ-
बांगलादेश संघ:
शकिब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसेन, महमुदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, इबादोत हुसेन, इबामोन हुसेन, मोहम्मद नईम.

श्रीलंका टीम:
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, मथिशा पथिराना, दिलशान मदुशहन फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल

बांगलादेश- श्रीलंकेचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
बांगलादेश:
मोहम्मद नईम, अनामुल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), अफिफ हुसैन, महमूदुल्लाह, मोसादेक हुसैन, महेदी हसन, सैफुद्दीन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान

श्रीलंका:
पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरित असलंका, दनुष्का गुणथिलका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसरंगा, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, महेश थीक्षाना, पथिराना, दिलशान मदुशंका

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या पिटाऱ्यात आऊट ऑफ सिलॅबस शॉट, खुद्द हिटमॅन रोहितकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचं फळफळलं नशीब, टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड
भारताच्या विजयानंतर आमिरवर भडकले पाकिस्तानी फॅन्स; म्हणाले, “तू फिक्सर होतास आणि राहशील”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---