नुकतीच श्रीलंका आणि भारत क्रिकेट संघात द्विपक्षीय मालिका खेळण्यात आली होती. ज्यात ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश होता. या मालिकेच्या सुरुवातीलाच श्रीलंका संघातील काही खेळाडू आणि मालिकेदरम्यान भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, तरीही संपूर्ण मालिका खेळवण्यात आली.
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या या मालिकेचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला भरपूर फायदा झाल्याचे दिसत आहे. या द्विपक्षिय मालिकेमूळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डची (एसएलसी) चांगलीच कमाई झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डिसिल्वा यांच्या मते श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील मालिकेमुळे एसएलसीला तब्बल १४.५ मिलयन युएस डॉलर म्हणजेच भारतीय चलन रुपयामध्ये ही रक्कम १०७.७ करोड रुपयांचा फायदा झाला.
श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिका सुरळीत पार पडली होती. मात्र टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोरोना संक्रमित आढळला. त्यामुळे उर्वरित २ टी-२० सामने होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र भारताने उर्वरित खेळाडूंना संघात सामील करून राहिलेले दोन टी-२० सामने खेळले.
दरम्यान, चालू मालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने, भारतीय क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द करण्याचे ठरवले होते. परंतु नंतर बीसीसीआयने उर्वरित दोन टी-२० सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दुसरा टी-२० सामना एका दिवसासाठी स्थगित करण्यात आला होता. ज्याला दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आले. भारतीय संघाने जर या मालिकेतून माघार घेतली असती, तर श्रीलंका क्रिकेट बोर्डला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले असते. परंतु दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डाने मिळून ही मालिका पूर्ण केली. ज्यात एकदिवसीय मालिका भारताने २-१ ने तर, टी-२० मालिका १-२ ने श्रीलंकाने जिंकली.
एसएलसीचे सचिव मोहन डिसिल्वा ‘डेली एफटी’ सोबत बोलताना म्हणाले, “श्रीलंका भारत दरम्यानचा दौरा केवळ तीन एकदिवसीय सामन्यांचा होता. परंतु एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वाने बीसीसीआयसोबत बातचीत करून यामध्ये आणखीन तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश करण्यात आला. त्यामुळे सामन्यांचे प्रसारण आणि मैदानातील इतर अधिकारांमुळे श्रीलंकन बोर्डला १०७.७ करोडचा आर्थिक फायदा झाला.”
“खरेतर बीसीसीआय आणि भारत सरकारने कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील भारतीय संघाला श्रीलंका दौरा करण्यासाठी प्रोत्साहित केले. हे सर्व आमचे बीसीसीआय सोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे झाले.” असेही डिसिल्वा म्हणाले. त्याच बरोबर श्रीलंका क्रिकेटने नियोजित मालिका पूर्ण पार पाडल्यामुळे बीसीसीआयचे आभार मानले. कारण आधीच कोरोनामुळे श्रीलंकाच्या नियोजित मालिका रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटचे खूप नुकसान झाले होते.
महत्वाच्या बातम्या –
- सलामीवीर म्हणून रोहितचाच बोलबाला! वाचा ‘ही’ आकडेवारी
- कमी उंचीमुळे क्रिकेटमध्ये मिळाला होता नकार, आता भारताविरुद्ध ५ वर्षांनंतर केले पुनरागमन
- ‘मैं निकला गड्डी लेके…’, सनी देओलच्या गाण्यावर ‘गब्बर’ची बाईक रायडींग; व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया