---Advertisement---

संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आणखी एक धक्का! मॅचविनर विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 10:23 AM
Sri-Lanka
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. अ गटातील चार सामने पूर्ण झाले असून, नेदरलँड्स दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर श्रीलंका व नामिबियाने प्रत्येकी एक विजय मिळवलाय. पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केलेल्या श्रीलंकेला आता एक धक्का बसला. संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा मांडीच्या दुखापतीमुळे टी20 विश्वचषकातून बाहेर होऊ शकतो.

एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, युएई विरूद्धच्या सामन्यात मांडीला दुखापत झाल्यामुळे चमिरा नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच उर्वरित स्पर्धेतील त्याचा सहभाग देखील अनिश्चित मानला जातोय. श्रीलंका या आधीच युवा वेगवान गोलंदाज प्रमोद मधुशान व अनुभवी फलंदाज धनुष्का गुणतिलका यांच्या दुखापतीमुळे हैराण आहे. त्या दोघांना देखील हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवतोय. त्यामुळे चमिरा दुखापतग्रस्त होणे संघासाठी मोठा धक्का मानला जातोय.

चमिराने युएईविरूद्धच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती. संघाच्या विजयात योगदान देताना त्याने 15 धावा देत 3 बळी टिपलेले. मात्र, दुखापतीमुळे तो आपला स्पेल पूर्ण करू शकला नव्हता. चमिरा हा सध्या श्रीलंकेचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असला तरी, अनेक महत्त्वाच्या सामन्यात तो दुखापतीमुळे सामील होऊ शकला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे तो मागील महिन्यात खेळला गेलेल्या आशिया चषकातही सामील झाला नव्हता.

श्रीलंका संघाला विश्वचषकाच्या सुरुवातीलाच नवख्या नामिबियाने 55 धावांनी पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर ‌‌‌युएई विरूद्ध त्यांनी 79  धावांनी विजय मिळवला. नेदरलँड्सविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो अथवा मरो अशा पद्धतीचा असेल. या सामन्यात पराभूत झाल्यास श्रीलंकेला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो
ऋतुचे ‘राज’! एकाच आठवड्यात ठोकले सलग दुसरे टी20 शतक; महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---